महसूल विभागाच्या दंडात्मक कारवाई विरोधात कुंभार समाज आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 05:16 PM2019-11-28T17:16:32+5:302019-11-28T17:26:45+5:30

कुंभार समाज वीटभट्टी व्यवसायिकांना जागेचा अनाधिृत वापर व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमासंदर्भात  स्थानिक तहसीलदार कार्यालयांकडून विविध समस्यांचा सामान कारवा लागत असून यासंदर्भात कुंभार समाजाच्या विटभट्टी व्यावसायिकांच्या समस्या तत्काळ दूर कराव्यात अशी मागणी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. 

Aquarius aggressor against criminal action of Revenue Department; | महसूल विभागाच्या दंडात्मक कारवाई विरोधात कुंभार समाज आक्रमक

महसूल विभागाच्या दंडात्मक कारवाई विरोधात कुंभार समाज आक्रमक

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयात कुंभार व्यावसायिकांचे निवेदन महसूल विभागाच्या कारवाई विरोधात आक्रमक भूमिका

नाशिक : कुंभार समाज वीटभट्टी व्यवसायिकांना जागेचा अनाधिृत वापर व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमासंदर्भात  स्थानिक तहसीलदार कार्यालयांकडून विविध समस्यांचा सामान कारवा लागत असून यासंदर्भात कुंभार समाजाच्या विटभट्टी व्यावसायिकांच्या समस्या तत्काळ दूर कराव्यात अशी मागणी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. 
महाराष्ट्र शासनाने कुंभार समाज व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायासाठी पाचशे ब्रास मातीवरील रॉयल्टी माफ करण्याचा निर्णय २१ जुलै २०१४ रोजी घेतला असून त्यासाठी ते ज्या जागेवर वीटभट्टी व्यवसाय करतात ती जागा आकृषिक करने बंधनकारक आहे. परंतु, नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य गावे ही वर्ग १ मध्ये समावेश झालेला असल्याने या भागातील जमीनी आकृषिक करण्याचे अधिकार ३१/८/ २००८ पासून उपविभागीय अधिकारी यांना आहेत. तहसीलदार कर्यालयात यासाठी प्रकरणे दाखल करूनही कोणतीही कारवाई होत नसून  इगतपुरी व कळवण वगळता अन्य तालुक्यातील व्यावसायिकांना अनाधिकृत जागेचा वापर केला म्हणून पंचवीस हजार व त्याहून अधिक रुपये दंडाच्या नोटीसा देऊन वीटभट्टी व्यवसायिकांकडून दंड वसूल करण्यात येत असल्याचा आरोप  कुंभार समाज विकास संस्थेने केला आहे.  त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ वीटभट्टी धोरण २०१६ नुसार वीटभट्टी व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाज पारंपरिक वीटभट्टीला पर्यावरण विभागाच्या परवानगीची आवश्यकता नसतानाही तहसीलदार यांना या संबधीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे न पाठवता परस्पर महसूल विभागाकडून कार्यवाही केली जात असल्याचा आरोही अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेने दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे  अध्यक्ष - मोहन जगदाळे, प्रदेश कार्याध्यक्ष - रंगनाथ सुर्यवंशी,  सोमनाथ सोनवणे, राजेंद्र सावंदे, नरेंद्र कलंकार, तुषार गारे,कृष्णा सोनवणे, छाया सोनवणे, किरण शिकारे आदी उपस्थित होते.

Web Title: Aquarius aggressor against criminal action of Revenue Department;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.