मुल्हेर ग्रामीण रुग्णालयाच्या प्रस्तावास तत्वतः मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:17 IST2021-09-21T04:17:17+5:302021-09-21T04:17:17+5:30
बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी दुर्गम भागातील रुग्णांसाठी मुल्हेर येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. दरम्यानच्या काळात ...

मुल्हेर ग्रामीण रुग्णालयाच्या प्रस्तावास तत्वतः मान्यता
बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी दुर्गम भागातील रुग्णांसाठी मुल्हेर येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. दरम्यानच्या काळात कोरोनाच्या संकटाने तालुक्यात थैमान घातले होते. उपचाराअभावी आदिवासी दुर्गम भागातील गरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड झाली तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला. याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून आरोग्य विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सचिव समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यासंदर्भात सोमवारी सचिव समितीच्या झालेल्या बैठकीत अनुशेषांतर्गत मुल्हेर ग्रामीण रुग्णालय, मुख्य इमारत व अधिकारी, कर्मचारी निवासस्थान बांधकामाच्या २२.०२ कोटीचे प्राथमिक अंदाजपत्रक व आराखड्यास तत्वतः मान्य देण्यात आली आहे. यामुळे प्रलंबित मुल्हेर ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग आता मोकळा झाला असून, तांत्रिक बाबींची पूर्तता करून मुल्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवर ग्रामीण रुग्णालयाची भव्य अशी सर्व सोयी-सुविधा असलेली अद्ययावत इमारत तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधकामानंतर खुले होणार असल्याचे बोरसे यांनी सांगितले.