शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

कायमस्वरूपी शिक्षण उपसंचालकाची नेमणूक करा ; मुख्याध्यापक संघाची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 3:19 PM

नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर कायमस्वरुपी अधिकाऱ्याची नियुक्ती होत नसल्याने शिक्षण विभागाला लागलेले ग्रहण लागल्याची भावना व्यक्त करीत नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षण उपसंचालक पदावर  कायमस्वरुपी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. 

ठळक मुद्देशिक्षण उपसंचालकपदी वारंवार प्रभारी अधिकारी अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलल्याने कामकाज ठप्पनिर्णयक्षम अधिकारी नियुक्तीची मुख्याध्यापकांची मागणी

नाशिक : विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर कायमस्वरुपी अधिकाऱ्याची नियुक्ती होत नसल्याने शिक्षण विभागाला लागलेले ग्रहण लागल्याची भावना व्यक्त करीत नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षण उपसंचालक पदावर  कायमस्वरुपी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर जवळपास दोन वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती होत असून तेही सतत बदलत असतात. त्यामुळे सध्या उपसंचालक कार्यालयातील शालार्थ आयडीसह इतर कामकाज ठप्प झाल्याचा आरोप मुख्याध्यापकांनी केला आहे. कायमस्वरुपी उपसंचालक अधिकारी नसल्याने नाशिक विभागातील चारही जिल्ह्यांमध्ये पालक/शिक्षक/ मुख्याध्यापक/ संस्थाचालक यांची गैरसोय होत आहे. अनेकदा उपसंचालक कार्याळयात येऊनही त्यांचे काम होत नसल्याने वेळ, पैसा खर्च होतो. तसेच उपसंचालकाकडे दोन-तीन विभागांचे अतिरिक्त कार्यभार असल्याने ते पूर्ण वेळ उपसंचालक कार्यालयात येऊ शकत नाही जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिकच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिक्षकांना तासनतास उपसंचालकांची वाट बघत ताटकळत बसावे लागते. यापूर्वी  प्रभारी उपसंचालकांनी ऑनलाईन कामाची चांगली सुविधा उपलब्ध करून दिली होती पण एकाच महिन्यात दुसरे प्रभारी शिक्षण उपसंचालक आले व ही योजना बारगळली. त्यामुळे या कार्यालयास कायमस्वरुपी, निर्णयक्षम व शिक्षकांच्या समस्या सोडविणाऱ्या उपसंचालकाची नेमणूक करावी, अन्यथा १७ ऑगस्ट २०२० पासून मुख्याध्यापक संघ व सर्व सहयोगी संघटना रस्त्यावर उतरनून शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करतील, असा इशाराही मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.के.सावंत, कार्याध्यक्ष एस.बी.शिरसाठ, सचिव एस.बी. देशमुख यांनी महसुल आयुक्त राजाराम माने यांना दिले आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकTeacherशिक्षकSchoolशाळा