शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
2
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
3
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
4
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
5
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
6
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
7
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
8
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
9
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
10
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
11
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
12
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
13
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
14
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
15
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
16
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
17
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
18
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
19
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
20
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय

‘खैर’ तस्करीप्रकरणी मोक्का लावावा; ‘मास्टरमार्इंड’च्या मुसक्या आवळण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 9:02 PM

वनविभागाच्या कर्मचार्‍याची मेहेरनजर व स्थानिक नागरिकांपैकी काही नागरिकांचा असलेला छुपा पाठिंबा यामुळे खैरची तस्करी याभागातून थेट गुजरातपर्यंत केली गेल्याचे निवेदनात म्हटले आहे. याबाबत सर्वप्रथम ‘लोकमत’ने दहा तारखेला वृत्त प्रसिध्द करुन धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. यानंतर वनविभाग खडबडून जागे झाले

ठळक मुद्देखैर तस्करीमध्ये गुंतलेल्या वन कर्मचार्‍यासह संशयित आरोपी व मास्टरमार्इंडच्या मुसक्या आवळण्याची मागणी. ‘आम्ही मालेगावकर...’ संघटनेने सर्व दोषी आढळणार्‍या संशयितांवर मोक्कान्वये कारवाईची मागणी

नाशिक : मालेगाव उपवनविभागातील ९० हेक्टरवरील जंगलामध्ये खैर तस्करतोडीप्रकरणी मालेगावकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खैर तस्करीप्रकरणी ‘आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीकडून मुख्य सुत्रधाराच्या मुसक्या आवळून सर्व संशयितांवर मोक्कान्वये कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.मालेगाव तालुक्यातील गाळणे, नागझिरी, चिंचवे, शिंदवाडी, विराणे, पोहाणे, रामपुरा आदि भागातील जंगलात मागली महिन्यामध्ये खैर प्रजातीच्या चारशेहून अधिक वृक्षांवर इलेक्ट्रिक कटर फिरविण्यात आला. वनविभागाच्या कर्मचार्‍याची मेहेरनजर व स्थानिक नागरिकांपैकी काही नागरिकांचा असलेला छुपा पाठिंबा यामुळे खैरची तस्करी याभागातून थेट गुजरातपर्यंत केली गेल्याचे निवेदनात म्हटले आहे. याबाबत सर्वप्रथम ‘लोकमत’ने दहा तारखेला वृत्त प्रसिध्द करुन धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. यानंतर वनविभाग खडबडून जागे झाले आणि मुख्य वनसंरक्षकांनी चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, एक संशयित बाबुराव राऊत यास ताब्यात घेण्यात आले असून त्याची कोठडी मंगळवारी (दि.३१) संपत असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, मालेगावकरांमध्येही याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून चिंचवे, गाळणेपासून तर मुख्य मालेगाव शहरातील सामाजिक संघटनांकडूनही खैर तस्करीमध्ये गुंतलेल्या वन कर्मचार्‍यासह संशयित आरोपी व मास्टरमार्इंडच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली जात आहे. ‘आम्ही मालेगावकर...’ संघटनेने सर्व दोषी आढळणार्‍या संशयितांवर मोक्कान्वये कारवाईची मागणी मुख्य वनसंरक्षकांसह उपविभागीय वनधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकार्‍याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर निखील पवार, यशवंत खैरनार, देवा पाटील आदिंच्या स्वाक्षºया आहेत.

 

टॅग्स :Nashikनाशिकforestजंगल