शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या बहुचर्चित पोलीस आयुक्तांचा बदलीसाठी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 11:08 IST

‘भूमाफिया’ ही लघू चित्रफित प्रसिद्ध करून महसूल खात्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.  

नाशिक : हेल्मेट सक्ती असो वा पेट्रोल पंप चालकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल  करण्याचा निर्णय, नेहमीच आपल्या निर्णयामुळे वादग्रस्त व चर्चेत राहणारे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पाेलीस महासंचालकांकडे अकार्यकारी पदावर बदलीसाठी अर्ज केला आहे. खुद्द पाण्डेय यांनी याला दुजोरा दिला असला तरी बदलीमागे अन्य कोणतेही कारण नसून, व्यक्तिगत कारणांसाठी बदलीसाठी विनंती केल्याचे त्यांनी म्हटले आहे.   दीपक पाण्डेय  यांनी दोन वर्षांपूर्वी कोरोना काळात नाशिक पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कोरोना काळात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाला थेट विरोध करत जिल्हा प्रशासनाशी दोन हात करण्याची तयारी केली. त्यानंतर शहरातील अवैध दारू विक्री, मटका, जुगार अड्डे बंद करण्याचे काम पोलिसांचे नसल्याचे सांगून वाद वाढवून घेतला होता. तर हेल्मेट सक्तीच्या कामासाठी आरटीओकडे बोट दाखविले होते. या काळात गुन्हेगारांविरुद्ध कडक भूमिका घेत मोक्काचे हत्यार उपसले होते. याच दरम्यान, ‘भूमाफिया’ ही लघू चित्रफित प्रसिद्ध करून महसूल खात्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.  

पेट्रोल पंपांवर पोलिसांची नेमणूक करून ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ अशी भूमिका घेतल्याने पेट्रोल पंपचालकांनी त्यांना थेट न्यायालयात खेचले होते. दरम्यानच्या काळात शहरातील गुन्हेगारीविषयी सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून चौफेर टीका होताच पेट्रोल पंपांवरून पोलिसांना माघारी बोलावण्याची नामुष्की पोलीस आयुक्तांवर ओढवली होती. दरम्यानच्या काळात पोलीस चौक्यांमध्ये पोलिसांची दारू पार्टी रंगल्याची घटना घडल्यानंतर पाण्डेय यांनी शहरातील ६५ पोलीस चौक्या बेकायदेशीर ठरविल्या होत्या. दोन दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्तांनी विनाहेल्मेट चालकांना पेट्रोल देणाऱ्या पेट्रोल पंप चालकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. तर नववर्षानिमित्त स्वागत यात्रा काढणाऱ्या सामाजिक संघटनांना परवानगी नाकारून रोष ओढवून घेतला होता. यामुळे पोलीस आयुक्तांविरोधात लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारकडे तक्रारीही केल्या होत्या.  

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसTransferबदली