शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रोलिंग’च्या दाहकतेचे ‘साधे आहे...’तून दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 01:16 IST

समाजमाध्यमे हा एक अदृश्य महाराक्षस असून, ‘ट्रोलिंग’ नावाची एक अजस्त्र आणि अक्राळविक्राळ शक्ती त्यात आहे. त्या शक्तीपुढे कोणालाही टिकणे अशक्य असल्याची, कायदा तकलादू असल्याची आणि माणूस हतबल असल्याची जाणीव करून देण्यात ‘साधे आहे इतकेच’ हे नाटक यशस्वी ठरले.

नाशिक : समाजमाध्यमे हा एक अदृश्य महाराक्षस असून, ‘ट्रोलिंग’ नावाची एक अजस्त्र आणि अक्राळविक्राळ शक्ती त्यात आहे. त्या शक्तीपुढे कोणालाही टिकणे अशक्य असल्याची, कायदा तकलादू असल्याची आणि माणूस हतबल असल्याची जाणीव करून देण्यात ‘साधे आहे इतकेच’ हे नाटक यशस्वी ठरले.राज्य नाट्य स्पर्धेत नाट्यसेवाच्या वतीने साधे आहे इतकेच हे नाटक सादर करण्यात आले. समाजमाध्यमांतून लोक व्यक्त होऊ लागले. मग खूप व्यक्त होत नंतर व्यक्त होण्यासाठी अस्वस्थ होऊ लागले. समाज माध्यमाचा वापर होत, तो कुणाला तरी उद्ध्वस्त करण्याच्या पातळीपर्यंत पोहोचलाय. त्यातील विकृत छळवणुकीचं तंत्र म्हणजे ट्रोलिंग आहे. त्यापुढे सध्याच्या विश्वातील सारी यंत्रणा, माणूसदेखील हतबल असल्याचे चित्रण त्यातून मांडण्यात आले आहे.व्यवसायाने कन्टेन्ट रायटर असलेल्या क्र ांती पाटील हिने समाजमाध्यमावर व्यक्त होण्यासाठी ब्लॉग हे माध्यम निवडलेले असते. क्रांतीचे ब्लॉग लोकप्रिय होऊ लागल्याने तिचे फॉलोअर्स वाढतात. ती सामाजिक आणि राजकीय मत व्यक्त करू लागते. त्यामुळे तिच्याही नकळत एक विरोधी प्रवाह तिच्याविरुद्ध कार्यरत होतो. आभासी जगातला हा विळखा तिच्याभोवती घट्ट होत जातो. ती प्रतिकार करते आणि ट्रोल होऊ लागते. देवेन कापडणीस यांच्या अत्यंत कसदार आणि बंदिस्त संहितेला दिग्दर्शक धनंजय वाबळे यांनी पुरेपूर न्याय दिला आहे. कृतार्थ कन्सारा यांची प्रकाशयोजना आणि रोहित सरोदे यांचे संगीत संयोजनदेखील प्रभावी होते.आजचे नाटक - भोवरावेळ - सायंकाळी ७ वाजता

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिकTheatreनाटक