कॉम्रेड पानसरेंच्या हत्त्येच्या निषेधार्थ आज नाशिक बंदचे आवाहन
By Admin | Updated: February 22, 2015 00:37 IST2015-02-22T00:36:52+5:302015-02-22T00:37:24+5:30
कॉम्रेड पानसरेंच्या हत्त्येच्या निषेधार्थ आज नाशिक बंदचे आवाहन

कॉम्रेड पानसरेंच्या हत्त्येच्या निषेधार्थ आज नाशिक बंदचे आवाहन
नाशिक : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडून शासन करावे, या मागणीसाठी तसेच सरकारच्या निषेधार्थ डाव्या आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे़ नाशिक शहरासह संपूर्ण जिल्'ात हा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सिटूचे सरचिटणीस डॉ़ डी़ एल़ कराड यांनी दिली़ डाव्या पक्षाने पुकारलेल्या या बंदला नाशिक शहर व जिल्हा ग्रामीण काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे़ डॉ़ डी़ एल़ कराड, अंधश्रद्धा निर्मूलनचे महेंद्र दातरंगे, कृष्णा चांदगुडे, आपचे जितेंद्र भावे, शशी उन्हवणे यांनी हुतात्मा स्मारकात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली़ (प्रतिनिधी)