मोर्चाच्या दिवशी बाजार समित्या बंद ठेवण्याचे आवाहन

By Admin | Updated: September 13, 2016 00:42 IST2016-09-13T00:42:29+5:302016-09-13T00:42:39+5:30

डांगसौंदाणे, तरसाळी, विंचूर, निफाड : मराठा समाजबांधवांच्या बैठकीला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची हजेरी

Appeal to keep market committees closed on the day of the rally | मोर्चाच्या दिवशी बाजार समित्या बंद ठेवण्याचे आवाहन

मोर्चाच्या दिवशी बाजार समित्या बंद ठेवण्याचे आवाहन

नाशिक : मराठा समाजबांधवांच्या वतीने शनिवार दि.२४ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या मूक मोर्चाच्या नियोजनासाठी निफाड, विंचुर, डांगसौंदाणे, तरसाळी येथे सोमवारी बैठक संपन्न झाली. लाखांहून अधिक समाजबांधव मोर्चात सहभागी होण्याचा संकल्प करण्यात आला.
निफाड येथे झालेल्या सभेत माजी आमदार दिलीप बनकर म्हणाले की, मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी हातभार लावणे गरजेचे आहे. तालुक्यातून लाखोच्या संखेने समाजबांधव उपस्थित राहणार असल्याने या दिवशी बाजार समित्या बंद ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. आमदार अनिल कदम यांनी मोर्चाला सर्वांनी ताकद लावावी. समाजासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी वैर बाजूला ठेऊन मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन केले.
बैठकीला तालुक्यातील सर्वच पक्ष, संघटनांचे नेते, पदाधिकारी तसेच सरपंच, पंचायत समिती सदस्य, सोसायटी अध्यक्ष, नगरसेवक, सभापती, संचालक पक्षभेद विसरून उपस्थित होते. मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध एक दिवस नौकरी, धंदा, शेती, सर्व काम बंद ठेवून समाजबांधवांनी मोर्चात सहभागी व्हावे. असे ठरविण्यात आले.
याप्रसंगी राजाराम पानगव्हाने, बाळासाहेब क्षीरसागर राजेंद्र डोखळे, अनिल कुंदे, सोपान खालकर आदिंसह अनेकांनी मार्गदर्शन केले. आमदार अनिल कदम, माजी आमदार दिलीप बनकर, राजाराम पानगव्हाणे, राजेंद्र डोखळे, अनिल कुंदे, बाळासाहेब क्षीरसागर, सोपान खालकर, वैकुंठ पाटील, उद्धव निमसे, प्रणव पवार, यतिन कदम, नानासाहेब पाटील, माणिकराव बोरस्ते, भास्कर बनकर, वाल्मीक कापसे, रमेश जेऊघाले, नंदकुमार कापसे, दिलीप कापसे, उन्मेश डुंबरे, विलास मत्सागर, नितीन कापसे, कैलास कुंदे, संजय कुंदे, उत्तम गडाख, सतीश मोरे, चंद्रकांत बनकर,
लक्ष्मण निकम, हरिश्चंद्र भवर, डॉ. चांदर, डॉ. उत्तम डर्ले, संदीप तासकर, संदीप टर्ले, बाळासाहेब बनकर, देवदत्त कापसे, डॉ. नारायण लोखंडे, उल्का कुरणे,अश्विनी मोगल, कलावती चव्हाण, निर्मलाताई खर्डे, संजय वाबळे , उन्मेश डुंबरे, सिद्धार्थ वनारसे, आण्णासाहेब बोरगुडे, बापुसाहेब कुंदे, शांताराम दाते, रावसाहेब गोळे, शिवा मोरे, संजय धारराव, राजाराम दरेकर प्रगती पगार, शिवानी जेऊघाले आदिंसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोपर्डी घटनेतील अल्पवयीन मुलीला श्रद्धांजली वाहून ब राष्ट्रगीताने बैठकीचा समारोप करण्यात आला.
डांगसौंदाणेत बैठक
डांगसौंदाणे : मराठा मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी बागलाण तालुक्यातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत व तुळजाभवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नियोजनाखाली बैठक पार पडली.
नाशिक येथे काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या क्रांती मोर्चासाठी समाजबांधवांनी उपस्थितीत राहून मराठा समाजाची ताकद दाखवून द्यावी. आपण वेगवेगळ्या पक्षांतर्फे राजकारणात सक्रिय असलो, तरी समाजहितासाठी सर्व वाद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित येऊन नाशिक येथील मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे, असे बैठकीदरम्यान आवाहन करण्यात आले.आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने प्रत्येकाने मनापासून मोर्चात सहभागी व्हावे, मोर्चात जास्तीत जास्त समाजबांधवांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील रहावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे रामचंद्र बापू पाटील, जि. प. सदस्य अनिल पाटील, शैलेश सूर्यवंशी, वसंत भामरे आदिंनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी अनिल सोनवणे, अंबादास सोनवणे, रवींद्र सोनवणे, महेंद्र सोनवणे, मुन्ना सोनवणे, निवृत्ती सोनवणे, सोपान सोनवणे, सुशीलकुमार सोनवणे, आबा सोनवणे, कडू सोनवणे, राजेद्र सोनवणे, अमोल सोनवणे, बबलू सोनवणे, दीपक खैरनार, महेश सोनवणे, सचिन सोनवणे, संदीप सोनवणे आदिंसह समाजबांधव उपस्थित होते.
तरसाळी
तरसाळी : बागलाण तालुक्यातील औंदाणे येथे मोर्चासंदर्भात बैठक घेण्यात आली.
येथील मारुती मंदिरात बैठक संपन्न झाली. मराठा समाजावर अन्याय होऊ नये या मागण्यांसाठी नाशिक येथे मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील यांनी सांगितले.
यावेळी काका रौंदळ, प्रशांत सोनवणे, शैलेश सूर्यवंशी, अनिल पाटील, संजय सोनवणे, पांडुरंग सोनवणे, अरविंद सोनवणे अनिल चव्हाण, वसंत भामरे, प्रकाश निकम, संदीप खैरणार, महेश निकम आदि पदधिकाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
विंचूर : येथील बैठकीत विंचूर व परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचण्यासाठी बैठका घेणे, पोस्टर्स लावणे, नाशिकला जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करणे याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. रमेश सालगुडे, शंकर दरेकर, राजाराम दरेकर, ज्ञानेश्वर घायाळ, अ‍ॅड. विनोद गुंजाळ, मनोज बोराडे, किशोर मवाळ, संधान, पप्पू खापरे, रणजित गुंजाळ आदिंनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शंकर दरेकर यांनी केले. बैठकीला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चांदवड
चांदवड : नाशिक येथे दि. २४ सप्टेंबर रोजी आयोजित मराठा क्रांती मूक मार्चाच्या नियोजनासाठी दि. १२ ते १७ सप्टेंबर या कालावधीत तालुक्यात गावनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. माजी आमदार शिरीष कोतवाल, बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन अहेर, डॉ. सयाजीराव गायकवाड, अ‍ॅड. नितीन ठाकरे बैठकीत सहभाग नोंदवत आहे. सोमवारी दुगाव गटातील राहुड, कळमदरे, सुतारखेडे, डोगंरगाव, उसवाड, दरेगाव, डोणगाव, निमोण, वराडी, वाद, कानडगाव, शिंगवे, वाघदर्डी, वडगावपंगू, कातरवाडी, भडाणे, रायपूर आदि गावांमध्ये बैठका संपन्न झाल्या. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे दत्तात्रय गांगुर्डे, प्रशांत गायकवाड आदिंसह सर्व मराठा संघटनेचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. मंगळवारी (दि. १३) तळेगाव गटातील निमगव्हाण, पाथरशेंबे, नन्हावे, पन्हाळे,
अहिरखेडे, गंगावे, निंबाळे, तळेगावरोही, वाकी खुर्द, वाकी बु।।, काळखोडे, साळसाणे, वाहेगावसाळ, रेडगाव खुर्द, काजीसांगवी, सोनीसांगवी, कोलटेक पाटे, दहिवद, दिघवद अशा दिवसभर बैठका होणार असल्याची माहिती देण्यात आली. (लोकमत चमू)

Web Title: Appeal to keep market committees closed on the day of the rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.