गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST2021-09-02T04:30:30+5:302021-09-02T04:30:30+5:30

महानगरपालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयात गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस प्रभाग सभापती योगेश शेवरे, नगरसेवक ...

An appeal to celebrate Ganeshotsav simply | गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन

महानगरपालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयात गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस प्रभाग सभापती योगेश शेवरे, नगरसेवक सलीम शेख, विभागीय अधिकारी नितीन नेर, तानाजी निगळ, पोलीस उपनिरीक्षक बी. एस. बोडके, आर. एन. गायकवाड, अग्निशमक केंद्रप्रमुख प्रदीपसिंह परदेशी आदींसह प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

विभागीय अधिकारी नितीन नेर यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली. त्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नियमांप्रमाणे पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारावेत. सजावट भपकेबाजी नसावी. मूर्ती सार्वजनिक मंडळासाठी ४ फूट व घरगुती गणपतीकरिता २ फुटांची असावी. मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असावी. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम राबवावेत. यासह कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी संजय अमृतकर,नरेंद्र वाळुंजे, सचिन सिन्हा, आकाश भंदुरे, सचिन सांगळे आदींसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: An appeal to celebrate Ganeshotsav simply