"मालेगावकरांची माफी मागा, अन्यथा...", दादा भुसे बजावणार सुषमा अंधारेंना नोटीस

By संजय पाठक | Published: October 23, 2023 08:34 PM2023-10-23T20:34:23+5:302023-10-23T20:35:19+5:30

सुषमा अंधारे यांनी सर्वप्रथम आरोप केल्याने त्यांना आता न्यायालयात खेचण्यात येणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले.

"Apologise to the people of Malegaon, otherwise...", Dada Bhuse will serve as a notice to Sushma Andhare | "मालेगावकरांची माफी मागा, अन्यथा...", दादा भुसे बजावणार सुषमा अंधारेंना नोटीस

"मालेगावकरांची माफी मागा, अन्यथा...", दादा भुसे बजावणार सुषमा अंधारेंना नोटीस

नाशिक - शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पाठोपाठ आता राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे हे ठाकरे गटाच्याच नेत्या सुषमा अंधारे यांना कोर्टात खेचण्याच्या तयारीत आहेत. 

आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी माहिती दिली ड्रग्ज माफिया ललित पाटील यांच्याशी दादा भुसे यांचे संबंध असून त्याला कारागृहातुन ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी दादा भुसे यांनी फोन केले होते, असा आरोप सुषमा अंधारे यांनी सर्वप्रथम केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी त्याला समर्थन दिले होते. दरम्यान, नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात दादा भुसे यांना टार्गेट करून त्यांच्या चौकशीची मागणी ही संजय राऊत त्यांनी केली होती. 

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी सर्वप्रथम आरोप केल्याने त्यांना आता न्यायालयात खेचण्यात येणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले. यापूर्वी मालेगाव येथे 178 कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्यावर केला होता. त्यामुळे संजय राऊत यांनी मालेगावकरांची माफी मागावी यासाठी दादा भुसे यांच्या समर्थकांनी राऊत यांना कोर्टात हजर राहण्याची नोटीस दिली होती. आज त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र संजय राऊत आज उपस्थित नव्हते.

Web Title: "Apologise to the people of Malegaon, otherwise...", Dada Bhuse will serve as a notice to Sushma Andhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.