वासोळच्या उपसरपंचपदी अनुश्री भामरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 00:38 IST2021-06-15T22:48:12+5:302021-06-16T00:38:46+5:30
लोहोणेर : देवळा तालुक्यातील वासोळ येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी येथील .अनुश्री उमेश भामरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली

वासोळच्या उपसरपंचपदी अनुश्री भामरे यांची बिनविरोध निवड झाल्याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ.
लोहोणेर : देवळा तालुक्यातील वासोळ येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी येथील .अनुश्री उमेश भामरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच दिगंबर पवार यांनी आवर्तन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने मंगळवारी (दि.१५) संरपच अनिता खुरसाने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत अनुश्री भामरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी दगडू भामरे, दगा अहिरे, उमेश भामरे, ग्रामविकास अधिकारी एन. एन. सोनवणे, सदस्य अलका पगार, विलास अहिरे, सोनाली महाले, वंदना पवार ,अशोक निकम, दिगंबर पवार, प्रमिला गिरासे, विजय पवार, चंद्रकांत पाटील, कैलास भुमरे, केशव सुर्यवंशी, साहेबराव पगार, योगेश महाले, संदीप अहिरे, गोरख भामरे, उत्तम भामरे, दिलीप सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी महादेव कोळी संघटनेचे तालुका अध्यक्ष तथा लोहोणेर येथील जनकल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेश पवार यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच अनुश्री भामरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वप्नील निकम, सागर भालेराव, संदीप उशीरे, आदी उपस्थित होते.