अनुजा उगले फास्टेस्ट स्विमर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 17:03 IST2019-04-25T17:03:45+5:302019-04-25T17:03:51+5:30
स्विमिंग फेडरेशन आॅफ इंडियाच्या विद्यमाने अॅक्वामॅन स्पोर्ट्स, मुंबई यांनी आयोजित केलेल्या सनरॉक ते गेटवे आॅफ इंडिया या ५ कि.मी. च्या राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेत महिला गटामध्ये अनुजाने सर्वात जलद जलतरणपटूचा सन्मान मिळविला.

अनुजा उगले फास्टेस्ट स्विमर
अनुजा उगले फास्टेस्ट स्विमर
स्विमिंग फेडरेशन आॅफ इंडियाच्या विद्यमाने अॅक्वामॅन स्पोर्ट्स, मुंबई यांनी आयोजित केलेल्या सनरॉक ते गेटवे आॅफ इंडिया या ५ कि.मी. च्या राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेत महिला गटामध्ये अनुजाने सर्वात जलद जलतरणपटूचा सन्मान मिळविला. एकूण ७९ महिला स्पर्धकांमध्ये अनुजाने हा बहुमान मिळविला.
आयोजकांतर्फेतिला ट्रॉफी, प्रशस्तिपत्र तसेच रु. १०,००१ देऊन तिचा सत्कार करण्यात आला.
अनुजा ही ट्रायथलॉन या खेळात आंतरराष्ट्रीय खेळाडू असून, आतापर्यंत तिने या खेळात आणि स्विमिंगमध्ये अनेक पारितोषिके मिळविली आहेत.
अनुजा सावरकर तरण तलावावर तिचे प्रशिक्षक राजेंद्र निंबाळते यांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचा सराव करते. तसेच या यशामध्ये तिला तरण तलावाचे हरिभाऊ सोनकांबळे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. (25 अनुजा उगले)