महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने  अनधिकृत बांधकाम हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:38 IST2018-04-25T00:38:07+5:302018-04-25T00:38:07+5:30

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने नाशिक पूर्व विभागातील काझीपुरा तसेच सुचितानगर येथील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला. यावेळी पाच अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.

 The anti-encroachment team of Municipal corporation has removed unauthorized construction | महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने  अनधिकृत बांधकाम हटवले

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने  अनधिकृत बांधकाम हटवले

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने नाशिक पूर्व विभागातील काझीपुरा तसेच सुचितानगर येथील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला. यावेळी पाच अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.  पूर्व विभागातील धोंडगे चौक, काझीपुरा येथील अन्नपूर्णा गोविंद तांबोळी यांचे आर.सी.सीमध्ये केलेले तळमजल्यावरील अनधिकृत बांधकाम पथकाने हटविले. त्यानंतर सुचितानगर येथील सिबल अपार्टमेंट येथील सुरेश शेट्टी यांचे साईड मार्जिनमध्ये उभारलेले शेड, लोखंडी अँगलचे छत, पाठीमागील बाजूस बांधण्यात आलेली भिंत, दुकानाच्या समोर उभारलेले शेड, सामासिक अंतरातील प्रवेशद्वारावरही  हातोडा चालविण्यात आला. याशिवाय, वास्तुविशारद अश्विनी पाठक यांनी गाळ्यासमोर अनधिकृतपणे उभारलेले प्रवेशद्वारही हटविण्यात आले.

Web Title:  The anti-encroachment team of Municipal corporation has removed unauthorized construction