Anti-encroachment campaign against Ain festival | ऐन सणासुदीत मनपाची अतिक्रमण विरोधी मोहीम
ऐन सणासुदीत मनपाची अतिक्रमण विरोधी मोहीम

नाशिक : शहरात दिवाळी सणाच्या निमित्ताने बाजार फुलला असताना महापालिकेच्या वतीने शनिवारी (दि. १९) रविवार कारंजासह मेनरोड भागात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. अचानक राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे विक्रेत्यांची धावपळ उडाली.
सध्या सराफबाजारातील फूलबाजार हटविण्याची सुवर्णकारांची मागणी आहे. त्यामुळे मध्यंतरी महापालिकेने मोहीम राबविली होती. आता पुन्हा शनिवारी ही जोरदार मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे विक्रेत्यांची धावपळ उडाली. महापालिकेने अनेक विक्रेत्यांचे साहित्य आणि हातगाड्या जप्त केल्या.

Web Title: Anti-encroachment campaign against Ain festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.