शहरात चीनविरोधात आंदोलने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:28 IST2020-06-19T22:56:12+5:302020-06-20T00:28:57+5:30

चिनी सैन्याने सीमारेषा ओलांडून भारतीय सैन्यावर आक्रमक केल्याने त्यात अनेक भारतीय सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले. चीनच्या कृत्याचा निषेध नोंदवत प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने चीन राष्ट्राध्यक्षांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात येऊन पुतळा दहन करण्यात आला.

Anti-China protests in the city | शहरात चीनविरोधात आंदोलने

शहरात चीनविरोधात आंदोलने

ठळक मुद्देपडसाद : तीव्र घोषणाबाजी; जोडामारोसह प्रतीकात्मक पुतळा दहन

पंचवटी : चिनी सैन्याने सीमारेषा ओलांडून भारतीय सैन्यावर आक्रमक केल्याने त्यात अनेक भारतीय सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले. चीनच्या कृत्याचा निषेध नोंदवत प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने चीन राष्ट्राध्यक्षांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात येऊन पुतळा दहन करण्यात आला.
नगरसेवक प्रियंका माने यांनी या निषेध कार्यक्रम आयोजन केले होते. यावेळी चीन बनावट मोबाइल फोन, टीव्ही स्क्रीन, चिनी बनावटीचे इलेक्ट्रिकल उपकरणांची तोडफोड करण्यात येऊन चिनी वस्तू जाळण्यात आल्या. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’ असे म्हणत चीनविरोधी घोषणा दिल्या. याप्रसंगी चंद्रशेखर पंचाक्षरी, विलास कारेगावकर, धीरज बर्वे, रमेश बुरकुल, धनंजय माने, सोमनाथ बोडके, दगा पाटील, पंढरीनाथ चासकर, शोभा माने, कौस्तुभ पाटील, शोभा आदींसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते. शहरातील नाशिकरोड तसेच सिडको परिसरातही नागरिकांनी आंदोलने केली.
संभाजी ब्रिगेडकडून पुतळ्याचे दहन
संभाजी ब्रिगेडच्या वतीने निषेधार्थ चीनचा राष्ट्रध्वज व राष्ट्रध्यक्ष यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन करून निषेध व्यक्त केला. चीनच्या या कृत्याच्या निषेधार्थ शहरातील मेनरोडवरील गाडगे महाराज पुतळ्याजवळ संभाजी ब्रिगेडकडून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व चीनच्या राष्ट्राध्यक्ष व चीनच्या विरोधात घोषणाबाजी करून चीनचा झेंडा व राष्ट्राध्यक्षांचा पुतळा दहन करून व चिनी वस्तूंचा बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी संभाजी
ब्रिगेडचे जिल्हा सचिव नितीन रोठे पाटील, महानगरप्रमुख प्रफुल्ल वाघ, अजय मराठे, विकी गायधनी, हिरामण नाना वाघ, नीलेश कुसमोडे, नितीन पवार, शंतनू चारहाटे, कृष्णा शिंदे, हर्षल पवार, सनी ठाकरे, गणेश सहाणे, विशाल धामोडे, राहुल तिडके, राहुल वाघ, विश्वदीप पंडित आदी उपस्थित होते.
भाजयुमोची घोषणाबाजी
भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगराच्या निवडक कार्र्यकर्त्यांनी सीबीएस येथील हुतात्मा स्मारक येथे चीनने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. सैनिकांवर हल्ला करणाऱ्या चीनचा धिक्कार असो, वंदे मातरम, चीनचा जाहीर निषेध, असे लिहिलेले फलक हातात धरून निषेध केला. यावेळी तीव्र घोषणा करण्यात आली. भाजपा युवा मोर्चा शहर शहराध्यक्ष अ‍ॅड. अजिंक्य साने, मध्य मंडल भाजपा अध्यक्ष देवदत्त जोशी, युवा मोर्चा शहर सरचिटणीस अमित घुगे, अमोल पाटील, हर्षद जाधव, पवन उगले आदी उपस्थित होते.

Web Title: Anti-China protests in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.