स्वाइन फ्लूचा आणखी एकाचा बळी मालेगावच्या दादाजी सोनवणेंचा मृत्यु
By Admin | Updated: February 24, 2015 01:38 IST2015-02-24T01:38:22+5:302015-02-24T01:38:49+5:30
स्वाइन फ्लूचा आणखी एकाचा बळी मालेगावच्या दादाजी सोनवणेंचा मृत्यु

स्वाइन फ्लूचा आणखी एकाचा बळी मालेगावच्या दादाजी सोनवणेंचा मृत्यु
नाशिक : शहरासह जिल्'ात स्वाइन फ्लूची साथ वाढत चालल्याने खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये संशयित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ नाशिक जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात रविवारी उपचारासाठी दाखल आलेले मालेगावचे दादाजी साहेबराव सोनवणे यांचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला़ त्याचे स्वॅब (घशातील स्त्रावाचे नमुने) पुणे येथे पाठविण्यात आले असून, अद्याप त्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झालेला नाही़ जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्लू संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली असून, महापालिका हद्दीत दहा स्क्रिनिंग सेंटर सुरू करण्यात आले आहेत़ १ जानेवारी ते २३ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत या स्क्रिनिंग सेंटरवर ५५७ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, २६९ रुग्णांना टॅमी फ्लूची गोळ्या देण्यात आल्या आहेत़ जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्लू संशयित १९, मनपा रुग्णालयांमध्ये ४, तर खासगी रुग्णालयांमध्ये दहा रुग्ण उपचार घेत आहेत़ त्यापैकी १३ पॉझिटीव्ह, तर दहा निगेटिव्ह आहेत़ जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीबाहेरील दाखल करण्यात आलेल्या १४ स्वाइन फ्लू संशयित रुग्णांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे़ स्वाइन फ्लूने आतापर्यंत शहर व जिल्'ात सहा नागरिकांचा बळी घेतला आहे़ त्यात सिन्नर तालुक्यातील दोन, जेलरोड येथील एक, भगूर येथील एक, मालेगाव तालुक्यातील एक, येवला तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे़ या रोगाने मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरिकांमध्ये त्यामध्ये मनपा हद्दीतील दोन, तर जिल्'ातील चार नागरिकांचा समावेश आहे़