शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

अग्निशमन प्रमुखाची आणखी एक चौकशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:15 AM

शासनाचे परिपत्रक दडवून ठेवल्याप्रकरणी एक लाख रुपयांचा दंड ठोठावलेल्या नाशिक महापालिकेतील अग्निशमन प्रमुख अनिल महाजन यांच्याविरुद्ध प्रशासनाने आणखी एक चौकशी प्रस्तावित केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. महाजन यांचा सेवानिवृत्तीचा काळ जसा जवळ येत चालला आहे, तसे ते चौकशांच्या फेऱ्यात अडकत चालले आहेत.

नाशिक : शासनाचे परिपत्रक दडवून ठेवल्याप्रकरणी एक लाख रुपयांचा दंड ठोठावलेल्या नाशिक महापालिकेतील अग्निशमन प्रमुख अनिल महाजन यांच्याविरुद्ध प्रशासनाने आणखी एक चौकशी प्रस्तावित केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. महाजन यांचा सेवानिवृत्तीचा काळ जसा जवळ येत चालला आहे, तसे ते चौकशांच्या फेऱ्यात अडकत चालले आहेत.  प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेचे अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन यांच्याविरुद्ध आणखी काही आरोप निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी चौकशी लावण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने, सन २०१० ते २०१८ या कालावधीत पूर्वपरवानगीचे १३६८ ना हरकत दाखले महाजन यांनी दिले परंतु, नगररचना विभागाच्या माहितीनुसार ती संख्या ११३४ इतकी आहे. महाजन यांना काही दिवसांपूर्वीच शासनाचे ३० आॅक्टोबर २०१४ चे परिपत्रक दडवून ठेवल्याप्रकरणी प्रशासनाने एक लाख रुपयांचा दंड केलेला आहे.विभागीय चौकशी प्रस्तावितदोन्ही विभागाच्या माहितीत तफावत निदर्शनास येते. याशिवाय, मुख्यालयातील अग्निशमन सेवेबाबत बेफिकीर असणे, बिटको हॉस्पिटलमधील यंत्रणा बसविण्यास मुदतवाढ देताना महाजन यांनी दिलेल्या अभिप्रायात असलेली अनियमितता यासह अन्य कारणास्तव महाजन यांची विभागीय चौकशी प्रस्तावित असून, त्यासंबंधीची फाईल आयुक्तांसमोर गेल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका