शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परमबीर सिंह यांच्या नावे सिन्नरमध्ये बेनामी मालमत्ता?

By श्याम बागुल | Updated: October 11, 2021 01:24 IST

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावे त्यांचा साथीदार संजय मिश्रीलाल पुनुमिया याने नाशिकसह सिन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेनामी मालमत्ता खरेदी केली असून, त्यासाठी त्याने शेतकरी असल्याचा बनावट पुरावा जोडल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरी त्यातील आरोपी ‘हायप्रोफाईल’ असल्याने पोलीस यंत्रणेकडून सावध पावले टाकली जात आहेत. विशेष म्हणजे संशयित आरोपी संजय पुनुमिया हा भाजपच्या एका आमदाराचा नातेवाईक असल्यामुळे त्यांच्या मदतीने जिल्ह्यातील काही राजकीय व्यक्तींकडूनही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देसंजय पुनुमियाने केले खरेदीखत : पोलिसांकडून सखाेल चौकशी

नाशिक : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावे त्यांचा साथीदार संजय मिश्रीलाल पुनुमिया याने नाशिकसह सिन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेनामी मालमत्ता खरेदी केली असून, त्यासाठी त्याने शेतकरी असल्याचा बनावट पुरावा जोडल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरी त्यातील आरोपी ‘हायप्रोफाईल’ असल्याने पोलीस यंत्रणेकडून सावध पावले टाकली जात आहेत. विशेष म्हणजे संशयित आरोपी संजय पुनुमिया हा भाजपच्या एका आमदाराचा नातेवाईक असल्यामुळे त्यांच्या मदतीने जिल्ह्यातील काही राजकीय व्यक्तींकडूनही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे.

सध्या संजय पुनुमिया हा माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह एका खंडणीच्या गुन्ह्यात सहआरोपी म्हणून तुरुंगात असल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे त्याच्या शोधासाठी फारशी पावले सिन्नर पोलिसांकडून उचलली गेली नसल्याचे आठवडाभराच्या तपासावरून स्पष्ट झाले आहे. मूळ ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या संजय मिश्रीलाल पुनुमिया याने सिन्नर तालुक्यातील मौजे धारणगाव, मिरगाव, पाथरे येथे काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी केली आहे. ही जमीन खरेदी करताना संजय पुनुमिया याने शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून दोन सातबारे जोडले व त्याआधारे सिन्नरच्याच दुय्यम निबंधक कार्यालयात त्याचे खरेदीखत तयार केले गेले आहे. गेल्या काही वर्षांपासून सदरची कोट्यवधीची जमीन संजय पुनुमिया व त्यांचा मुलगा सनी या दोघांच्या नावे असून, संजय पुनुमिया याचा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी असलेल्या जवळीकतेतूनच ही खरेदीची प्रक्रिया सहज व सुलभपणे पार पडल्याची चर्चा आहे. काहींच्या मते पुनुमिया याच्या नावे परमबीर सिंह यांनीच या जमीन खरेदीत गुंतवणूक केली असण्याची शक्यता आहे.

चौकट====

असा झाला उलगडा

संजय पुनुमिया याने सिन्नर तालुक्यात जमीन खरेदी करताना जोडलेले शेतकरी असल्याच्या पुराव्यांबाबत काही दिवसांपूर्वी सिन्नर पोलीस व तहसीलदार कार्यालयात मुंबईच्या अग्रवाल नामक इसमाने तक्रार करून संजय पुनुमिया हा बनावट शेतकरी असल्याचा व त्याने बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जमिनी खरेदी केल्याचे म्हटले. त्याचा आधार घेऊन संजय पुनुमिया याच्या उत्तन (ठाणे) येथील खरेदीखतांची सत्यता पडताळणी केली असता, त्यातील एका जमीन खरेदीत बाबुलाल जे अग्रवाल व त्यांच्या बंधूंचे सातबारे उतारे जोडलेले दिसून आले तर दुसऱ्या जमीन खरेदीत जोडण्यात आलेल्या सातबारा उताऱ्याच्या मालकांचा ठाण्याचे तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी शोध घेतला असता, त्याचे मालकही पुनुमिया नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संजय पुनुमिया याने बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन सदरच्या जमिनी खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

चौकट====

राजकीय हस्तक्षेपाची चर्चा

संजय पुनुमिया याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी असलेले संबंध तसेच भाजपाच्या आमदार गीता जैन या नातेवाईक असल्याने सदरचे प्रकरण ‘हायप्रोफाईल’ गटात मोडले गेले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईचे बिल्डर श्याम अग्रवाल यांचे पुतणे शरद अग्रवाल यांनी परमबीर सिंह, संजय पुनुमिया यांच्यासह सात जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंदविलेला आहे. त्यात परमबीर सिंह फरार आहे. पुुनुमियाच्या जमीन खरेदी प्रकरणात जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीनेही मध्यस्थी चालविली असून, त्यामुळे तपासावर काही प्रमाणात परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी