आरकेएम विद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 11:45 PM2020-01-09T23:45:37+5:302020-01-09T23:46:06+5:30

कळवण : येथील आरकेएम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनात पार पडलेल्या विविध स्पर्धा, स्व. ए.टी. पवार यांच्या ...

Annual prize distribution of RKM school | आरकेएम विद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण

कळवण येथील आरकेएम विद्यालयाच्या स्नेहसंमेलन वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी विद्यार्थ्यांना गौरविताना आमदार नितीन पवार. समवेत शशिकांत पवार, बाबुलाल पगार, राजेंद्र भामरे, भूषण पगार, रवींद्र पगार, राकेश हिरे आदी.

Next
ठळक मुद्देकळवण : कथालेखनासह विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कळवण : येथील आरकेएम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनात पार पडलेल्या विविध स्पर्धा, स्व. ए.टी. पवार यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेली कथालेखन स्पर्धा, वर्षभरातील विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार नितीन पवार यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पवार होते.
शालेय जीवनात आनंद देणाऱ्या आनंदमेळ्यातूनच विद्यार्थ्यांचे कलागुणांचे दर्शन होते. आणि विद्यार्थी कौतुकास पात्र ठरतात. त्यावेळी पाठीवर मिळणारी शाबासकीची थाप विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करते. गुरुजनांनी केलेले मार्गदर्शन हे मार्गदर्शक ठरते. त्यामुळे शिक्षकवर्गदेखील कौतुकास पात्र आहे, असे आमदार पवार यांनी मनोगतात सांगितले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कळवण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब शिंदे, संचालक बाबुलाल पगार, राजेंद्र भामरे, भूषण पगार, हेमंत बोरसे, माजी प्राचार्य एन. पी. पवार, प्राचार्य एल. डी. पगार, रवींद्र पगार, राकेश हिरे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्नेहा पगार, श्रुती बोरसे (भारती विद्यापीठात राज्यात प्रथम), सिद्धेश भामरे, सिद्धी कोठावदे (शिष्यवृत्ती), कुंदन रौंदळ, अनुष्का चव्हाण, साक्षी आहेर, युगंधरा पवार, सिद्धी कोठावदे, श्रुती कोठावदे, श्वेता गवळी (कथाकथन), तर विविध क्र ीडा स्पर्धेतील यशस्वी समीक्षा सूर्यवंशी, वैशाली चव्हाण, ईश्वरी पवार, नीरज पाटोळे, दर्शन पाटील, हर्षदा पवार, श्रुती बोरसे, गौरी शार्दुल, दर्शन शिरसाठ, हर्षवर्धन खैरनार, गौरव पगार, प्रगती अलई, दिव्या पगार, श्रुती खैरनार, चेतन बहिरम, हर्षल पगार, तन्वी बच्छाव आदी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी प्राचार्य एल. डी. पगार, उपप्राचार्य बी. एस. दिवटे, पर्यवेक्षक एन. डी. देवरे, जे. आर. जाधव, ए. डी. गवळी, बी. एच. भारती यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पी. एम. महाडिक यांनी केले. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांचे कला-कौशल्ये विकसित व्हावी, या उद्देशाने महाविद्यालयातर्फे चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यासह विविध स्पर्धांचे वर्षभरात आयोजन करण्यात आले होते. आमदार पवार यांच्या हस्ते पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

Web Title: Annual prize distribution of RKM school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.