डांग सेवा मंडळ संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:52 IST2018-02-13T23:12:57+5:302018-02-13T23:52:42+5:30
जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.

डांग सेवा मंडळ संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
अभोणा : येथील डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेसह समूहनृत्य, नाटिका, मूकअभिनय सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कै. डॉ. विजय बीडकर कलानगरीत संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष हेमलता बीडकर उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कळवणचे पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील, उपाध्यक्ष अण्णासाहेब मराठे, संचालक प्रभाकर पवार, श्रावण म्हसदे, संजय जगताप, अभोण्याच्या सरपंच मीरा पवार, उपसरपंच तारा पवार, श्रीमती तावडे, राजेंद्र वेढणे, किशोर शहा, सुबोध गांगुर्डे, रत्नाकर वेढणे, अरु ण कोठावदे, भानुदास बोरसे आदी उपस्थित होते. प्राचार्य नंदकिशोर बधान यांनी प्रस्ताविक करून उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार केला. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. किरण सूर्यवंशी व सचिन कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.