श्री माणकेश्वर वाचनालयाची वार्षिक सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:17 IST2021-04-05T20:40:47+5:302021-04-06T00:17:13+5:30

निफाड : येथील श्री माणकेश्वर वाचनालयाची १०१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोशल डिस्टनसिंग व शासकीय नियमांचे पालन करून वाचनालयाच्या सभागृहात वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

Annual meeting of Shri Mankeshwar Library | श्री माणकेश्वर वाचनालयाची वार्षिक सभा

वाचनालयाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलतांना अध्यक्ष मधुकर शेलार समवेत उपस्थित मान्यवर.

ठळक मुद्देदिलीप जाधव यांचा उत्कृष्ट वाचक पुरस्कार

निफाड : येथील श्री माणकेश्वर वाचनालयाची १०१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोशल डिस्टनसिंग व शासकीय नियमांचे पालन करून वाचनालयाच्या सभागृहात वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

प्रारंभी थोर समाजसुधारक न्या. रानडे व माणकेश्वर वाचनालयाच्या संस्थापकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. चिटणीस बाळासाहेब कापसे यांनी मागील वर्षाचे इतिवृत्त व अहवाल वाचन केले. सभासद दिलीप जाधव यांचा उत्कृष्ट वाचक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी नगरसेवक अनिल कुंदे,नंदू कापसे,ॲड. लक्ष्मण वाघ यांनी सूचना मांडल्या. याप्रसंगी महेश जंगम ,उपाध्यक्ष ॲड. प्रवीण ठाकरे, चिटणीस बाळासाहेब कापसे, दत्ता उगावकर, राजेंद्र खालकर,राहुल दवते,सुनील चिखले उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. एम. सोनवणे यांनी तर आभार कवी राजेंद्र सोमवंशी यांनी मानले.

Web Title: Annual meeting of Shri Mankeshwar Library