साहित्य परिषदेच्या शाखेची वार्षिक सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:31 IST2019-07-09T00:30:41+5:302019-07-09T00:31:25+5:30

महाराष्ट्र साहित्य परिषद नाशिकरोड शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

 Annual meeting of the Sahitya Parishad Branch | साहित्य परिषदेच्या शाखेची वार्षिक सभा

साहित्य परिषदेच्या शाखेची वार्षिक सभा

नाशिकरोड : महाराष्ट्र साहित्य परिषद नाशिकरोड शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. मसाप नाशिकरोड शाखेची पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा चेहेडी पंपिंग येथील आदर्श विद्यामंदिरमध्ये पार पडली. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, उपाध्यक्ष दत्ता गायकवाड, प्रमुख कार्यवाह प्रसाद पवार, कोषाध्यक्ष सुदाम सातभाई, कार्यवाह रवींद्र मालुंजकर, प्रा. मनीषा विसपुते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, उपाध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी गेल्या चार वर्षांतील कामाचा आढावा घेतला. बडोदा साहित्य संमेलनात शाखेचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. विक्रांत जाधव यांनी मिळालेले मानधन शाखा कार्यासाठी दिले. सभेतील चर्चेत रमेश औटे, वसंत पाटील, पांडुरंग गायधनी, सुशांत उबाळे, प्रशांत कापसे, संजय करंजकर, दादाजी शिंदे, प्रा. प्रतिभा जाधव-निकम, विष्णु गायखे, रवींद्र मालुंजकर व सुदाम सातभाई, डॉ. प्रताप गुजराथी यांनी भाग घेतला.  यावेळी अलका अमृतकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविक कामिनी तनपुरे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेखा गणोरे व आभार संगीता पाटील यांनी मानले.

Web Title:  Annual meeting of the Sahitya Parishad Branch