कौर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:12 IST2020-01-02T23:11:48+5:302020-01-02T23:12:10+5:30

टोकडे येथील सत्यवती कौर माध्यमिक विद्यालय व कै. प्रशांत शांताराम लाठर कला महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन झाले. अध्यक्षस्थानी प्रायार्य एस.डी.फरस होते.

Annual Convention of Kaur School | कौर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन

मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील सत्यवती कौर विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना विद्यार्थिनी.

ठळक मुद्देटोकडे : विद्यार्थिनींनी सादर केले सांस्कृतिक कार्यक्रम

मालेगाव : तालुक्यातील टोकडे येथील सत्यवती कौर माध्यमिक विद्यालय व कै. प्रशांत शांताराम लाठर कला महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन झाले. अध्यक्षस्थानी प्रायार्य एस.डी.फरस होते.
प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती सुवर्णा देसार्इं यांचा सत्कार संस्थेचे सेक्रेटरी अजित लाठर यांच्या हस्ते करण्यात आला.
झोडगे जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर देसले, विठ्ठलराव देशमुख, संस्थेचे सेक्रेटरी अजित लाठर, हाताणे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अहिरे, पाडळदे विद्यालयाचे मुख्याध्यापक युवराज पगार, किरण पगार, टोकडे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ठाकर, जळकू जि.प. शाळेचे शेवाळे यांचा सत्कार करण्यात
आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यांनी सादर केलेल्या कला गुणांना उपस्थित श्रोत्यांनी दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. एस. पाटील यांनी केले. आभार ए. व्ही सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Annual Convention of Kaur School