नर्सिंग महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन
By Admin | Updated: May 10, 2015 23:49 IST2015-05-10T23:49:05+5:302015-05-10T23:49:25+5:30
नर्सिंग महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन

नर्सिंग महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन
नाशिक : येथील गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित नर्सिंग महाविद्यालयात शपथविधी व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. एम. एस. गोसावी, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शेखर राजदेरकर, एस. डी. प्रधान, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. डी. प्रधान, विजय गोसावी उपस्थित होते.
परिचय मोहम्मद हुसेन यांनी केला व कार्यक्रमाचे प्रास्ताविक व महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे वाचन प्राचार्य ज्योती ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाअंतर्गत प्रथम वर्षातील बी.एस.सी. नर्सिंग व आर. जी. एन. एस. या विद्यार्थ्यांचा दीपप्रज्वलन व शपथविधी झाला. तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सर्व शिक्षकवृंदाचे सत्कार व विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. एम. एस. गोसावी यांनी माणूस म्हणून विद्यार्थी सुसंस्कृत झाला पाहिजे. हे शिक्षणाचे नियोजन आहे, असे सांगितले, तर डॉ. राजदेरकर यांनी नर्सिंगबद्दल महत्त्व विशद केले.
मनीषा गावंजे, आरती लिंगदोर व हेमलता बिर्ला यांनी कार्यक्रम केले. सूत्रसंचालन मेलिसा फर्नांडीस व प्रज्ञा परिकर, तर आभार प्रदर्शन कविता मातेरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्गाने प्रयत्न केले.