शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

शिक्षकांच्या संपामुळे जिल्ह्यातील शाळांना अघोषित सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:26 AM

शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व संवर्गातील वेतनत्रुटी दूर कराव्यात, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावेत, केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती, बालसंगोपन रजा व अन्य सवलती मिळाव्यात यांसह शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील शासकीय तथा निमशासकीय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि. ९) एक दिवसाचा लाक्षणिक संप करीत महाराष्ट राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देत बुधवार (दि. ११) पासून बेमुदत संप करण्याचा इशारा दिला आहे.

नाशिक : शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व संवर्गातील वेतनत्रुटी दूर कराव्यात, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावेत, केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती, बालसंगोपन रजा व अन्य सवलती मिळाव्यात यांसह शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील शासकीय तथा निमशासकीय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि. ९) एक दिवसाचा लाक्षणिक संप करीत महाराष्ट राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देत बुधवार (दि. ११) पासून बेमुदत संप करण्याचा इशारा दिला आहे.दरम्यान, जिल्हाभरातील तीन हजार २०० शाळांतील दहा हजार शिक्षक संपात सहभागी झाल्याने बहुतांश शाळा बंदच असल्याने विद्यार्थ्यांनाही अघोषित सुटी मिळाली होती.राज्य शासनाने शिक्षण क्षेत्रातील खासगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करून राज्यातील सर्व कार्यालयात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाºयांना कायम करावे, पदोन्नती व सरळ सेवेने करण्यात येणारी नियुक्ती यामधील प्रारंभिक वेतनातील तफावत दूर करावी, अनुकंपा भरती तत्काळ व विनाअट करावी, मागासवर्गीयांना पदोन्नतीने आरक्षण मिळावे व सरळ सेवा भरतीमधील अनुशेष भरावा, सर्व कर्मचाºयांची अर्जीत रजा साठविण्याची कमाल मर्यादा काढण्यात यावी तसेच शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये यांसह विविध मागण्यांसाठी हा शिक्षकांनी सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारून जिल्हाधिकाºयांना आपल्या मागण्यांचे निवेदनात दिले.यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे माजी राज्याध्यक्ष काळू बोरसे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर, नंदू आव्हाड, आदिवासी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोतीराम नाठे, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राहुल सोनवणे, आर. के. खैरनार, प्रमोद शिरसाठ, चंद्र्रशेखर उदावंत, प्रकाश गोसावी, लालसिंग ठोके, विशाल विधाते, शिवाजी बोरसे, उषा बोरसे, केदू देशमाने, प्रकाश सोनवणे आदींसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.११ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संपकर्मचाºयांच्या अनेक मागण्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला असून, नव्याने लागू करण्यात आलेली अंशदायी पेन्शन योजना ही शिक्षकांवर अन्याय करणारी असल्याने ती बंद करून जुनी योजना लागू करण्याची मागणी करतानाच मागण्यांची पूर्तता न झाल्यास ११ सप्टेंबरपासून राज्यभरात बेमुदत संप पुकारण्याचा इशाराही शिक्षकांनी या निवेदनातून दिला आला आहे. या संपाबाबतची तयारीदेखील झाल्याचे आयोजकांनी सांगितले.

टॅग्स :Teacherशिक्षकStrikeसंप