अकरावीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:47 IST2019-07-06T00:47:10+5:302019-07-06T00:47:25+5:30
: अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी (दि.५) सायंकाळी ७ वाजता नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील प्रवेशासाठी असलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अकरावीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
नाशिक : अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी (दि.५) सायंकाळी ७ वाजता नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील प्रवेशासाठी असलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सर्वसाधारण गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन दिवसांचा अवधी असून, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्राप्त तक्रारींवर ९ ते ११ जुलैदरम्यान निर्णय प्रक्रिया पूर्ण करून १२ जुलैला प्रथम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये काही तफावत अथवा बदल असल्यास बिटको महाविद्यालय नाशिकरोड येथे दिनांक दि. ६ व ८ जुलै या दोन दिवसांमध्ये विहित नमुन्यातील अर्जाच्या माध्यमातून आक्षेप नोंदविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. दरम्यान, अकरावी प्रवेशासाठी २१ हजार २४ विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, यात एक हजार ४४ विद्यार्थ्यांना ९० ते ९८.८ टक्के गुण असून, ४ हजार ९८९ विद्यार्थ्यांना ८० ते ८९.८३ टक्के गुण आहेत, तर ४ हजार ६२ विद्यार्थ्यांना ७० ते ७९.८ टक्के, ४ हजार ९९० विद्यार्थ्यांना ६० ते ६९.८३ टक्के, तीन हजार ४२१ विद्यार्थ्यांना ५० ते ५९.८३ टक्के, दोन हजार २३० जणांना ४० ते ४९.८ टक्के व २८८ विद्यार्थ्यांना ३५ ते ३९.८३ टक्के गुण आहेत.