वारकरी मंडळाची कार्यकारिणी घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:54 IST2020-02-23T22:41:50+5:302020-02-24T00:54:00+5:30
अखिल भारतीय वारकरी मंडळ संलग्नित पेठ शहर वारकरी मंडळाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, भीमाशंकर राऊत यांची अध्यक्षपदी तर रामदास शिरसाठ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

पेठ शहर वारकरी मंडळ कार्यकारिणी फलक अनावरणप्रसंगी अण्णा महाराज हिसवळकर, मनोज घोंगे, तुळशीराम वाघमारे, भीमाशंकर राऊत, रामदास शिरसाठ, संतोष देशमुख, चंद्रशेखर काळे, मंगेश रहाणे, दत्ता निकम, विक्र म चौधरी आदी.
पेठ : अखिल भारतीय वारकरी मंडळ संलग्नित पेठ शहर वारकरी मंडळाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, भीमाशंकर राऊत यांची अध्यक्षपदी तर रामदास शिरसाठ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
पेठ येथे रविवारी (दि.२३) नाशिक जिल्हा वारकरी मंडळाचे अध्यक्ष हभप अण्णा महाराज हिसवळकर यांच्या हस्ते कार्यकारिणी फलकाचे अनावरण करण्यात आले. पेठ शहरात वर्षभरात होणारे विविध धार्मिक उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, पारायण सोहळा, राष्ट्रपुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त वारकरी मंडळाने नियोजन करून समाज जागृतीचे कार्य करावे, असे आवाहन अण्णा महाराज हिसवळकर यांनी केले. याप्रसंगी पेठ तालुकाध्यक्ष पंढरीनाथ वालवणे, नगराध्यक्ष मनोज घोंगे, तुळशीराम वाघमारे, संतोष देशमुख, चंद्रशेखर काळे, मंगेश रहाणे, दत्ता निकम आदी उपस्थित होते.
अध्यक्ष- भीमाशंकर राऊत, उपाध्यक्ष- रामदास शिरसाठ, कार्याध्यक्ष- राजू काळे, सहकार्याध्यक्ष- महेश रहाणे तर सल्लागार म्हणून काशीनाथ वाकचौरे व सोमनाथ पवार, युवाध्यक्ष- मुन्ना डिंगोरे, युवा उपाध्यक्ष- विक्र म चौधरी, तर महिला प्रतिनिधी म्हणून कुसूम बत्तासे, मीराबाई मार्गे, भागाबाई राऊत यांचा समावेश आहे.