पेठ येथे खंडेराव महाराज मंदिराचा वर्धापनदिन
By Admin | Updated: February 13, 2015 23:46 IST2015-02-13T23:44:55+5:302015-02-13T23:46:46+5:30
यळकोट यळकोट जय मल्हार : दिवट्यांनी उजाळले शहर

पेठ येथे खंडेराव महाराज मंदिराचा वर्धापनदिन
पेठ : यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष, भंडारची मुक्त उधळण, पेटत्या दिवट्यांनी उजळून निघालेले शहर आणि ओसांडून वाहणारा भक्तांचा उत्साह अशा वातावरणात येथील खंडेराव मंदिराचा वर्धापनदिन मंगळवारी साजरा करण्यात आला़
सकाळी मंदिर परिसर फुलांच्या माळांनी आकर्षक सजविण्यात आला़ होमहवन व पूजापाठ झाल्यावर दुपारी भाविकांना महाप्रसाद देण्यात आला़ सायंकाळी साडेआठ वाजता गावातून भव्य दिवट्यांची मिरवणूक काढण्यात आली़
घरातील प्रत्येक जोडप्याने हातात दिवट्या घेतल्या होत्या़ त्यामुळे जवळपास पाचशेच्या वर दिवट्यांनी शहर उजळून निघाले़ वाघ्या-मुरळीच्या गाण्यावर ठेका धरत भाविकांनी भंडारची मुक्त उधळण करत यळकोट यळकोट जय मल्हारचा नारा दिला़
एका सजवलेल्या वाहनातून खंडोबा, म्हाळसा व बानूच्या वेशातील लहान बालके सर्वांचे लक्ष वेधून घेत होती़ मंदिरापासून निघालेली दिवट्यांची मिरवणूक जुन्या
बस स्टॅण्डवरून शोभायात्रा
मंदिरात आणण्यात आली़ राक्षी सामुदायिक जागरण गोंधळाचा कार्यक्रम घेण्यात आला़ यावेळी पेठ शहरासह तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते़ (वार्ताहर)