शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संगीनी महिला संस्थेच्या संस्थापक अनिता पगारे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 13:03 IST

पगारे यांनी महिलांसह युवा वर्गासाठी विविधप्रकारे सामाजिक कार्य केले आहे. पगारे यांनी कला शाखेतून राज्यशास्त्र विषयात पदवी मिळविली होती. तसेच मास्टर इन सोशल वर्क-फॅमिली चाईल्ड वेल्फेअर (एमएसडब्ल्यू) चीही पदवी त्यांनी घेतली होती.

ठळक मुद्देशिकमध्ये महिला हक्क संरक्षण समितीवर कार्यरत होत्याकौटुंबिक समुपदेशक व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख

नाशिक : पुरोगामी विचारांच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या संगीनी महिला जागृती मंडळ संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष अनिता पगारे (५०) यांचे रविवारी (दि.२८) निधन झाले. त्यांच्या निधनाने पुरोगामी संघटनांकडून हळहळ व्यक्त होत आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासोबतही त्यांनी काम केले आहे.नाशिक शहरातील चेतनानगर येथील रहिवासी असलेल्या अनिता पगारे यांचे अल्पशा आजाराने अचानकपणे निधन झाले. पगारे यांनी महिलांसह युवा वर्गासाठी विविधप्रकारे सामाजिक कार्य केले आहे. पगारे यांनी कला शाखेतून राज्यशास्त्र विषयात पदवी मिळविली होती. तसेच मास्टर इन सोशल वर्क-फॅमिली चाईल्ड वेल्फेअर (एमएसडब्ल्यू) चीही पदवी त्यांनी घेतली होती.१९९०-९९ साली पगारे या नाशिकमध्ये महिला हक्क संरक्षण समितीवर कार्यरत होत्या. कौटुंबिक समुपदेशक व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांनी यावेळी महिलांच्य न्यायहक्कासाठी लढा दिला होता. २०१९ साली कम्युनिटी डेव्हलपमेंट मोखाडा-जव्हार ब्लॉक हा प्रोजेक्ट राबविला होता. या प्रकल्पासाठी त्यांना ह्यओरेहनह्ण संस्थेच्या वतीने जबाबदारी सोपविण्यात आली होती. या प्रकल्पाच्या त्यांनी व्यवस्थापक म्हणून काम बघितले होते. यानंतर अल्पवयीन मुले, तरुण, पदव्युत्तर पदवी घेणारे विद्यार्थी यांच्या समुपदेशनासाठी त्यांनी विविध उपक्रमही राबिवले होते.२०१५-२०१६साली विश्वास ज्ञान प्रबोधिनी व रिसर्च सेंटरच्या वतीने समन्वयक म्हणून पगारे यांनी युवकांसाठी कार्य केले होते. तत्पुर्वी २००६-२००८साली पगारे यांनी राज्य सरकारच्या महिला व बालकांच्या विशेष सेलमध्ये समन्वयक म्हणून काम केले होते. २००१-२००२ साली रेशनिंग कृती समितीच्या संशोधन प्रकल्पामध्येही पगारे यांचा सहभाग होता.पगारे यांना १९९८साली यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई,च्या वतीने नवभारत युवा आंदोलनांतर्गत राज्यस्तरीय 'युवा पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले होते. नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण अकादमीमध्ये त्यांनी महिलांविषयक कायदे या विषयावर व्याख्याता म्हणून प्रशिक्षणार्थीं पोलीसांना धडे दिले. त्यांच्या अशा अचानकपणे झालेल्या निधनाने शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती मनोहर अहिरे व कन्या कल्याणी आणि किर्ती  असा परिवार आहे.

टॅग्स :NashikनाशिकWomenमहिलाDeathमृत्यूsocial workerसमाजसेवकMedha Patkarमेधा पाटकर