नांदुरीतील युवकांकडून पशूपक्षांसाठी दाणा, पाण्याची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 14:23 IST2019-05-08T14:23:35+5:302019-05-08T14:23:49+5:30
सप्तशृंगगड (नीलेश कदम ) : कळवण तालुक्यातील नांदुरी येथील मॉर्निंग ग्रुपच्या वतीने जंगलातील पशुपक्षांसाठी पाण्याची व्यवस्था केली असून तसेच ...

नांदुरीतील युवकांकडून पशूपक्षांसाठी दाणा, पाण्याची व्यवस्था
सप्तशृंगगड (नीलेश कदम ) : कळवण तालुक्यातील नांदुरी येथील मॉर्निंग ग्रुपच्या वतीने जंगलातील पशुपक्षांसाठी पाण्याची व्यवस्था केली असून तसेच धान्याची व्यवस्था केली आहे. नंदुरीचे माजी सरपंच सुभाष राऊत यांनी सांगितले की, सप्तशृंगगड रस्त्याच्या घाटात अनेक प्रकारचे पक्षी असून त्यांची पाण्यासाठी भटकंती दिसून आली असून यासाठी पाणी व खाद्याची व्यवस्था मॉर्निंग ग्रुप कडून केली आहे. उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जंगलातील पक्षांची भटकंती थांबविण्यासाठी ग्रुपचे सदस्य काम करतात. नांदुरीच्या जंगलात अनेक प्रकारची पक्षी आढळतात. यात मोर, फेसर, लावरी, तितुर, व्हलगी, कावळा, चिमणी, साळुंकी, फुलचुखी, रानघुबड, बगळा आदी पक्षांसह ससा, रानमांजर, रानडुक्कर आदी प्राण्याचे वास्तव्य आहे. ग्रुपचे सदस्य पोलीस कॉन्स्टेबल योगेश गवळी यांच्या प्रयत्नातून पाण्यासाठी कुंड्या आणल्या आहेत. यासाठी किरण अहिरे, गणेश अहिरे, कांतीलाल राऊत, नाना सदगीर, गणेश कदम, ताराचंद्र चौधरी, पवन साबळे, भूषण देशमुख, प्रवीण चित्ते हे सदस्यांनी प्रयत्न केले.