शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

प्राणीप्रेम : नाशिकच्या १८ मोकाट श्वानांच्या पिलांना लाभले पालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 7:52 PM

‘आवास’ संस्थेच्या वतीने दीड वर्ष वयोगटातील श्वान मोफत इच्छुक श्वानप्रेमींकडे संगोपनासाठी सोपविले. दिवसभरात १८ बेवारस मोकाट श्वानांच्या पिलांना संगोपनासाठी पालक लाभले.

ठळक मुद्देदोन वर्षांत २८ पिलांना मिळाले पालक१८ नाशिककरांनी मोकाट श्वानांची पिले दत्तक घेतलीश्वानांना ‘आवास’ प्राणीप्रेमी संस्थेमार्फत दत्तक घेत त्यांनी वेगळा पायंडा पाडला

अझहर शेख, नाशिक : प्राण्यांवर प्रेम असलेल्या नागरिकांची कमी नाही; मात्र या प्रेमापोटी रस्त्यावर आढळून आलेल्या श्वानांना दत्तक घेत एखाद्या विदेशी जातीच्या श्वानाप्रमाणे जिवापाड प्रेम करून संगोपन करणाºयांची संख्या अत्यल्प आहे. याउलट मोकाट कुत्र्यांविषयी ओरड करणाºयांची संख्या कितीतरी पटीने जास्त असताना मात्र काही नाशिककर रविवारी (दि.७) यास अपवाद ठरले. एकूण १८ मोकाट श्वानांना ‘आवास’ प्राणीप्रेमी संस्थेमार्फत दत्तक घेत त्यांनी वेगळा पायंडा पाडला.भटकी कुत्री व उपद्रव हे जणू समीकरणच झाले आहे. रस्त्यावर मोकाट कुत्रा दिसला की आपसूकच त्याच्या दिशेने दगड भिरकावला जातो; मात्र त्याचा फटका निरागस दिसणा-या त्यांच्या पिलांनाही बसतो आणि ब-याचदा त्यांचा जीवही जातो. अशाच काही पिलांना आश्रय देण्यासाठी नाशिककर सरसावल्याचे चित्र यावर्षीदेखील ‘पेट टुगेदर’च्या जत्रेत पहावयास मिळाले. विविध प्रकारचे देशी-विदेशी श्वान, अश्व, पक्षी यांची भरलेली जत्रा आणि या जत्रेत त्यांच्या मालकांकडून केली जाणारी देखभाल व काळजी बघता सर्वच भेट देणारे अवाक् झाले. या जत्रेत आलेल्या १८ श्वानप्रेमींनाही श्वानांचा लळा लागला तो भारतीय जातीच्या मोकाट कुत्र्यांच्या पिलांचा. ‘आवास’ संस्थेच्या वतीने दीड वर्ष वयोगटातील श्वान मोफत इच्छुक श्वानप्रेमींकडे संगोपनासाठी सोपविले. दिवसभरात १८ बेवारस मोकाट श्वानांच्या पिलांना संगोपनासाठी पालक लाभले. यावेळी आवासचे गौरव क्षत्रिय व त्यांच्या सहका-यांनी भटक्या कुत्र्यांविषयी उपस्थितांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोकाट श्वानांची पिले दत्तक घेणा-या नाशिककरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने १८ श्वानप्रेमींची नावे, पत्ता, संपर्क क्र मांक आदी माहितीची नोंद करण्यात आली. या सर्व नागरिकांना रस्त्यावरची श्वानांची पिले पाळताना घ्यावयाची काळजी, आवश्यक लसीकरण, औषधोपचाराविषयी मोफत माहिती व सल्ला पशुवैद्यकांमार्फत दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.---इन्फो--दोन वर्षांत २८ पिलांना मिळाले पालकमागील वर्षी पेट टुगेदरमध्ये आवास संस्थेकडून मोकाट श्वानांची दहा पिले नाशिककरांनी दत्तक घेतली होती. यावर्षी ही संख्या जवळपास दुप्पट झाली. १८ नाशिककरांनी मोकाट श्वानांची पिले दत्तक घेतली. एकूणच दोन वर्षांत २८ पिलांना पालक लाभले असून, हे शुभ वर्तमान मानले जात आहे.

टॅग्स :dogकुत्राNashikनाशिक