चांदवडला पशुसंवर्धन पदविकाधारकांचा संप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST2021-07-22T04:10:55+5:302021-07-22T04:10:55+5:30

पशुसंवर्धन पदविकाधारकांनी संपूर्ण कामबंद संप सुरू केला असून भारतीय पशुसंवर्धन कायदा १९८४ च्या अनुसार ...

Animal Husbandry diploma holders strike in Chandwad | चांदवडला पशुसंवर्धन पदविकाधारकांचा संप सुरू

चांदवडला पशुसंवर्धन पदविकाधारकांचा संप सुरू

पशुसंवर्धन पदविकाधारकांनी संपूर्ण कामबंद संप सुरू केला असून भारतीय पशुसंवर्धन कायदा १९८४ च्या अनुसार पशू प्रथम उपचार करण्याची परवानगी मिळावी, भारतीय पशुसंवर्धन कायदा १९८४ च्या अनुसार पशूचे कृत्रिम रेतन व गर्भ तपासणी करण्याची परवानगी मिळावी, सदरनमूद कामे करण्यासाठी स्वतंत्ररीत्या अधिकृत नोंदणीकृत परवानगी मिळावी, महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषदअंतर्गत रिक्त असलेले पशुधन पर्यवेक्षक पदे तातडीने भरावी, पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या अंतर्गत सेवादाता म्हणून काम केलेल्या पदविकाधारकांना ठरवून दिलेला लाभ मिळावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे उपस्थित होते. निवेदनावर तालुकाध्यक्ष डॉ. अजय ठोके, उपाध्यक्ष डॉ. बाळू वानखेडे, डॉ. अजरून गांगुर्डे, डॉ. तुषार सोनवणो, डॉ. गिरीश जाधव, डॉ. प्रकाश जाधव, डॉ. अमोल काळे, डॉ. गौतम कापडणो, डॉ. ज्ञानेश्वर शिंदे, डॉ. अभिमान ठाकरे, डॉ. विकास वाळुंज आदींच्या सह्या आहेत.

फोटो- २१ चांदवड पशुसंवर्धन

चांदवड तालुक्यातील पशुसंवर्धन संघटनेच्या वतीने संपाबाबतचे निवेदन आमदार डॉ. राहुल आहेर व डॉ. आत्माराम कुंभार्डे यांना देताना डॉ. अजय ठोके, डॉ. बाळू वानखेडे व पशुसंवर्धन संघटनेचे पदाधिकारी.

210721\21nsk_28_21072021_13.jpg

फोटो- २१ चांदवड पशुसंवर्धन  चांदवड तालुक्यातील पशुसंवर्धन संघटनेच्या वतीने संपाबाबतचे निवेदन आमदार डॉ. राहुल आहेर व डॉ. आत्माराम कुंभार्डे यांना देतांना डॉ.अजय ठोके, डॉ.बाळु वानखेडे व पशुसंवर्धन संघटनेचे पदाधिकारी. 

Web Title: Animal Husbandry diploma holders strike in Chandwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.