Anilkumar Pawar ED Raid News: वसई-विरार येथील आयुक्त महापालिकेचे माजी अनिलकुमार पवार यांच्या मालमत्तेवर केंद्र सरकारच्या सक्त वसुली संचलनालयाकडून (ईडी) टाच आणण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राज्यभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये १८ ठिकाणी छापे टाकले आहे. अनिलकुमार यांना त्यांच्या मातोश्रीने 'गिफ्ट' केलेला शहरातील पाथर्डी येथील पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेला भूखंडदेखील कागदोपत्री ईडीकडून जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या अखत्यारित कार्यरत असलेल्या अंमलबजावणी संचलनालय तथा सक्त वसुली संचलनालयाकडून अनिलकुमार यांच्या सेवानिवृत्तीच्या दुसऱ्याच दिवसापासून त्यांच्या ठाणे येथील शासकीय निवासस्थानापासून पुणे, नाशिकसह अठरा ठिकाणी छापासत्र सुरू झाले आहे.
पांडवलेणीच्या पायथ्याशी आहे प्लॉट
पांडवलेणी डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात पवार यांचा भूखंड आहे. एक लाख ४८ हजार रुपये इतके सरकारी भाव असलेल्या या भूखंडाचा बाजारभाव सुमारे ५० लाखांच्या घरात दाखविण्यात आले आहे. या भूखंडाच्या मालकी हक्कांबाबत कायद्याची पळवाट शोधण्याचा संबंधितांकडून प्रयत्न केला जात आहे.
अनिलकुमार यांच्या पुतण्याने पवार यांच्या मातोश्रींना हा भूखंड भेट दिला होता. यानंतर मातोश्री यांनी पवार यांना हा भूखंड बक्षीस स्वरूपात दिल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे; मात्र आता ईडीकडून पुढे याबाबत काय कारवाई केली जाते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, नाशिकमधील बागलाण-सटाणा तालुक्यात पवार यांच्या असलेल्या मालमत्तेची ईडीच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली आहे.
छाप्यांत एक कोटीचे घबाड सापडले?
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) वसई-विरारमधील अनधिकृत बांधकामप्रकरणी अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी - केलेल्या छापेमारीदरम्यान नाशिक न येथे १ कोटी २० लाखांची रोकड सापडल्याचे समजते.
काही मालमत्तांची कागदपत्रे देखील ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी ईडीने या प्रकरणी अन्य काही अधिकाऱ्यांवर केलेल्या छापेमारीदरम्यान नऊ कोटींची रोकड, २३ कोटींचे दागिने, चांदी तसेच मालमत्तांची कागदपत्रे जप्त केली आहेत.