राजीनाम्यासाठी नाराजी नाट्य

By Admin | Updated: June 29, 2014 00:48 IST2014-06-28T22:48:13+5:302014-06-29T00:48:01+5:30

राजीनाम्यासाठी नाराजी नाट्य

Angry play for resignation | राजीनाम्यासाठी नाराजी नाट्य

राजीनाम्यासाठी नाराजी नाट्य

 

सटाणा : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नानाजी दळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी संचालक मंडळाने दबाव आणल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राजीनाम्यासाठीच्या या नाराजी नाट्याने बाजार समितीत राजकारण तापले आहे.
संजय चव्हाण, राघो आहिरे, रामचंद्रबापू पाटील यांचा समावेश असलेल्या सुकाणू समितीच्या देखरेखखाली कारभार सुरू असलेल्या बाजार समितीच्या संचालक मंडळात सभापतिपदावरून अनेकदा आदळ-आपट होऊन वाद चव्हाट्यावर आला.
सभापतिपदी गेल्या वर्ष भरापूर्वी बाजार समितीत सर्वाधिक काळ सभापतिपदावर राहिलेले दळवी विराजमान झाले. सभापतिपदावर दीर्घकाळ राहणे हे दळवींच्या पारंपरिक विरोधक डॉ. विलास बच्छाव यांनी गाळे वाटप, नोकर भरती, बांधकामे याच्या विरोधात त्यांनी काहूर उठविले.
त्यातच मध्यंतरी बांधकामावरून संचालकांमध्ये असंतोष निर्माण होऊन दळवींविरोधात बंड पुकारले आणि रोटेशननुसार राजीनामा द्यावा, असे कारण दाखवत सह्यांची मोहीम राबविली. संचालकांनी केलेल्या मागणीचे पत्र सुकाणू समितीला सादर केले असून, त्यांनीही राजीनाम्याची री ओढली आहे.

Web Title: Angry play for resignation