शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नंदिनी नदीच्या अस्वच्छतेबाबत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:53 IST

महापालिकेचा ढिसाळ व नियोजनशून्य कारभार तसेच अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गेल्या काही दिवसांपासून नासर्डी नदीत मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला दिसत असून, यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सिडको : महापालिकेचा ढिसाळ व नियोजनशून्य कारभार तसेच अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गेल्या काही दिवसांपासून नासर्डी नदीत मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला दिसत असून, यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गोदामाई सामाजिक संस्थेने नाराजी व्यक्त केली आहे. नंदिनी नदीची स्वच्छता करावी, याबाबत संस्थेच्या वतीने सिडको प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांना निवेदन देण्यात आले.  नंदिनी नदीच्या संदर्भात लोकमत वृत्तपत्राने सद्यस्थितीची सत्य परिस्थिती मांडली. नंदिनी नदीत प्रचंड अस्वच्छता असून, औद्योगिक वसाहतीतील केमिकलयुक्त पाणी तसेच नागरिकांचे सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. केवळ पावसाळ्यात वाहणाºया या नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. त्यामुळे एरव्ही नासर्डी म्हटल्या जाणाºया या नदीपात्रातील प्रदूषण कमी करून तिला प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प काही सदस्यांनी केला होता. मात्र नासर्डीची नंदिनी करण्याचा प्रयत्न आता तरी फसला असून, नंदिनी नदी तर नासर्डीच, असे म्हणायची वेळ आली आहे. हे सर्व प्रकार थांबवून नंदिनी नदीत स्वच्छता मोहीम राबवून तिला प्रदूषण मुक्त करावे, अशी मागणी नाशिकची आई, गोदामाई या सामाजिक संस्थेच्या वतीने सिडको सभापती हर्षा बडगुजर यांच्याकडे केली. याप्रसंगी रवि वाघ, रोहन कानकाटे, अक्षय परदेशी, मयूर बगाड, स्वप्नील जाधव, कमलेश भोर, सचिन महाजन, मयूर लवटे, रोहित कुलकर्णी, रोहित ताराबादकर आदी उपस्थित होते.नदीच्या स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्चनंदिनी नदीच्या स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र काही दिवसांत परिस्थिती ‘जैसे-थे’च दिसून येत आहे. मनपाने याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी गोदामाई संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मनपाच्या संबंधित अधिकाºयांना कळवून नंदिनीची स्वच्छता करण्यात येईल, असे सभापती हर्षा बडगुजर यांनी संस्थेच्या सदस्यांना सांगितले.

टॅग्स :riverनदीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका