शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
2
भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, शत्रूचे धाबे दणाणार; स्वदेशी तेजस MK1 A लढाऊ विमानाचं उड्डाण
3
करणी सेनेत अध्यक्ष, ३ वर्षात मंत्रिपद... वाचा रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबाची स्पेशल कहाणी
4
“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका
5
Diwali 2025 Special Train: कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले?
6
रोज फक्त ३० रुपये वाचवून कोट्यधीश व्हा; काय आहे गुंतवणुकीचं सिक्रेट?
7
Shivaji Kardile: दूधाच्या व्यवसायापासून सुरुवात ते जिल्ह्यातील राजकारणात दबदबा; कोण होते शिवाजी कर्डिले?
8
Gujarat Cabinet Reshuffle: भूपेंद्र पटेलांच्या मंत्रिमंडळात १९ नवीन चेहरे, रिवाबा जडेजांसह तीन महिलांचा समावेश; वाचा संपूर्ण यादी 
9
पेट्रोलला पर्याय! देशातील सर्वात स्वस्त ५ इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ३.२५ लाखांपासून सुरू; दमदार फीचर्स
10
Rohit Sharma Viral Video : साधा सरळ आमचा दादा! चाहत्यांना भावली हिटमॅन रोहितची मराठी बोली
11
'या' शेअरची धमाकेदार एन्ट्री; ₹१४५ रुपयांवर लिस्ट झाला आयपीओ, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
12
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीचा खास नैवेद्य: धणे आणि गूळच का? या पदार्थांमागचं गुपित काय?
13
धक्कादायक! विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार; आरोपीने फोन करुन विचारले-गर्भनिरोधक गोळी देऊ का?
14
महायुती सरकारने केली शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्यांची दिवाळी काळी; काँग्रेसची बोचरी टीका
15
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
16
पलंगावर मृतदेह अन् हातातल्या मोबाईलवर फ्री फायर गेम सुरू; अवघ्या १३ वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?
17
'न्यायालयांनी संयम बाळगावा; प्रत्येक प्रकरणात CBI चौकशीचे आदेश देणे अयोग्य'- सुप्रीम कोर्ट
18
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
19
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
20
गेल्या ३ महिन्यात ८ टॉप कमांडरनं दिले राजीनामे; अमेरिकन सैन्यातून बडे अधिकारी नोकरी का सोडतायेत?

अंगणवाड्यांना गावातच मिळणार आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:03 IST

गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांना ‘रिंग’ करून पोषण आहार पुरविणाºया ठेकेदारांना सर्वाेच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर राज्य सरकारने आता गाव पातळीवरील महिला बचत गटांना अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविण्याचा ठेका देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे ठेकेदाराला दणका : महिला बचत गटांना देणार काम

नाशिक : गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांना ‘रिंग’ करून पोषण आहार पुरविणाºया ठेकेदारांना सर्वाेच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर राज्य सरकारने आता गाव पातळीवरील महिला बचत गटांना अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविण्याचा ठेका देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या हातांना काम मिळण्यास मदत होणार असून, जिल्ह्णातील अंगणवाड्यांसाठी १० सप्टेंबरपर्यंत निविदा दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.महिला व बालविकास खात्यांतर्गत येणाºया स्तनदा माता, कुपोषित बालकांच्या उत्थानासाठी शासनाने १९८४ पासून एकात्मिक बालविकास प्रकल्प सुरू केले असून, त्याद्वारे सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालके, स्तनदा मातांना घरपोच पोषण आहार देण्याचे तर तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना अंगणवाडीत ताजा पोषण आहार पुरविला जात आहे. त्यासाठी राज्यपातळीवरून एकात्मिक बालविकास प्रकल्प आयुक्तांमार्फत पोषण आहार पुरविण्यासाठी ठेका देण्यासाठी निविदा मागविल्याजात. गेल्या अनेक वर्षांपासून पोषण आहार पुरविण्याच्या नावाखाली गैरप्रकार करणाºया ठेकेदारांनी शासनाच्या या योजनेतून स्वत:चे चांगभलं करून घेतले. त्यासाठी ठेकेदारांनीच राज्य पातळीवर ‘रिंग’ करून वर्षानुवर्षे ठेका आपल्याकडे ठेवला.परिणामी या योजनेतून शासनाचा मुख्य हेतू सफल होऊ शकला नसला तरी, ठेकेदार व त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी, राज्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणात पोषण झाले. या संदर्भातील तक्रारी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्यानंतर न्यायालयाने गावपातळीवरूनच पोषण आहार पुरविण्याचे आदेश शासनाला दिले व त्यानुसार या योजनेतील ‘ठेकेदारी’ बंद करण्याचे पाऊल उचलले गेले. या बचत गटांकडे यापूर्वी पोषण आहार पुरविण्याचा अनुभव, पोषण आहार शिजविण्यासाठीची उपकरणे, स्वत:ची जागा, किमान ९० महिने पोषण आहार साठविण्यासाठी गुदाम, त्यातील स्वच्छता अशा सुमारे ७७ अटी-शर्ती घालण्यात आल्या असून, एका बचत गटाला पाच अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविण्याचे काम दिले जाणार आहे. त्यासाठी मात्र त्यांना आॅनलाइन निविदा भरावी लागणार आहे.जिल्ह्णात ५२४८ अंगणवाड्यांना लाभशासनाने महिला बचत गटांना पोषण आहार पुरविण्याचा ठेका देण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्णातील महिला बचत गटातील महिलांच्या हाताला काम व रोजगाराची निर्मिती होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्णात ४७७६ मोठ्या अंगणवाड्या असून, ५०२ मिनी अंगणवाड्या आहेत. त्यातील तीन लाख ८५ हजार ३५९ बालकांना ताजा व पोषण आहार यामुळे स्थानिक पातळीवरच मिळणार आहे.प्रत्येक जिल्ह्णात आता ग्रामपंचायत पातळीवर महिला बचत गटांना पोषण आहाराचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या आहारात बालके व स्तनदा मातांसाठी घरपोच पोषण आहार तर अंगणवाडीतील बालकांना ताजा पोषण आहार असे दोन प्रकारचे पोषण आहार पुरविण्यासाठी बचत गटांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदSchoolशाळा