अंगणवाडी होणार आता ‘आनंदवाडी’

By Admin | Updated: July 5, 2017 00:09 IST2017-07-05T00:09:35+5:302017-07-05T00:09:58+5:30

नाशिक : नित्यनव उपक्रम व योजना शासन राबवित असताना, त्यात आनंदवाडी’ उपक्रमाची भर पडली आहे.

Anganwadi will now be 'Anandavadi' | अंगणवाडी होणार आता ‘आनंदवाडी’

अंगणवाडी होणार आता ‘आनंदवाडी’

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांमधून बालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहवा यासाठी नित्यनव उपक्रम व योजना शासन राबवित असताना, आता त्यात नाशिक जिल्हा परिषदेच्या ‘आनंदवाडी’ उपक्रमाची भर पडली आहे. जिल्ह्णातील ७३ जिल्हा परिषद गटातून प्रत्येकी दोन अंगणवाड्यांची निवड या उपक्रमासाठी करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी दिली.
मंगळवारी (दि.४) जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी नवीन प्रशासकीय इमारतीतील विभागांना भेटी देऊन पाहणी केली. त्यात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला भेट देऊन टंचाईग्रस्त गावांची माहिती त्यांनी उपअभियंत्यांकडून तत्काळ मागविली आहे. ठोस उपाययोजना राबवून गावे टॅँकरमुक्त करण्यासाठी आवश्यक ती माहिती तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.

Web Title: Anganwadi will now be 'Anandavadi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.