दिंडोरी : एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना शासनाकडून चार महिन्यांपासून मानधनचा एक नवा पैसाही मिळाला नसून, मानधनावर ज्ञानदानाचे काम करणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील सेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.सेविकांना थकलेल्या मानधनासह वाढीव मानधनाची प्रतीक्षा असून, एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना केंद्र शासनातर्फे दोन हजार ९३७ रु पये मानधन मिळते. राज्य शासनाकडून एक हजार ५० रु पये मानधनात ९५० रु पयांची वाढ झाली. केंद्र आणि राज्य असे एकूण चार हजार ९३८ रुपये मानधन मिळणे अपेक्षित होते. मासिक मानधन व वाढीव रक्कम अद्याप मिळालेली नाही़(वार्ताहर)
अंगणवाडी सेविकांना मानधनाची प्रतीक्षा
By admin | Updated: August 23, 2015 22:27 IST