अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:50 IST2020-02-12T22:54:32+5:302020-02-12T23:50:01+5:30
सुरगाणा व पेठ तालुक्यातील अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका, मदतनीस यांनी नियमित वेतनासह इतर मागण्यांसाठी एल्गार पुकारला असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे.

पेठ येथे अंगणवाडीसेविका व मदतनिसांच्या आंदोलनप्रसंगी महेश टोपले, देवदत्त भगरे, रामदास सापटे, कमलेश बोसारे, निर्मला चौधरी, गुलाब चौधरी आदी.
पेठ : सुरगाणा व पेठ तालुक्यातील अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका, मदतनीस यांनी नियमित वेतनासह इतर मागण्यांसाठी एल्गार पुकारला असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे.
पेठ येथे आदिवासी भागातील अंगणवाडीसेविका व मदतनीस यांचा मेळावा घेण्यात आला. अंगणवाडी-सेविका आणि मदतनीस यांना मानधन न देता वेतन देण्यात यावे, प्रवास भत्ता, अमृत आहार योजना सुरू केली; पण त्याचे पैसे मात्र अद्याप भेटले नाही, अंगणवाडीत फ्रीज असावा, इमारती बांधल्या पाहिजेत, त्यांचे सेवा पुस्तक भरण्यात यावे आदी मागण्या मांडण्यात आल्या. याप्रसंगी देवदत्त भगरे, रामदास सापटे, कमलेश बोसारे, निर्मला चौधरी, गुलबा चौधरी यांच्यासह अंगणवाडीसेविका, डेटा आॅपरेटर, आशाताई, पोषण आहार शिजवून देणाºया बचतगट माहिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.