अंगुलगावचा कबड्डी संघ जिल्हास्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 23:03 IST2020-01-09T23:02:47+5:302020-01-09T23:03:20+5:30

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी सुरू असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेमध्ये अंगुलगाव शाळेच्या मुलांच्या कबड्डी संघाने तालुका-स्तरावर बाजी मारली असून, जिल्हास्तरावर येवला तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे.

Angadgaon's Kabaddi Sangh on district level | अंगुलगावचा कबड्डी संघ जिल्हास्तरावर

जिल्हास्तरावर निवड झालेल्या कबड्डी संघातील खेळाडूंचा सत्कार करताना सुरेखा दराडे. समवेत बाळासाहेब लोखंडे, नाना लोंढे, प्रवीण गायकवाड आदी.

येवला : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी सुरू असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेमध्ये अंगुलगाव शाळेच्या मुलांच्या कबड्डी संघाने तालुका-स्तरावर बाजी मारली असून, जिल्हास्तरावर येवला तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे.
तालुकास्तरावर झालेल्या स्पर्धेत अत्यंत चुरशीचे तीन सामने जिंकून विजेतेपद पटकाविले आहे. यशस्वी संघास शिक्षक गोपीनाथ पवार, विजय परदेशी, अरुण पवार, गणेश दसपुते, संजय आंधळे, किशोरी नाकोड, योगीता कुमावत, मनीषा थेटे आदींनी मार्गदर्शन केले.
या संघाचा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती सुरेखा दराडे, कॅबिनेट मंत्री भुजबळ यांचे स्वीय सहायक नाना लोंढे, बाळासाहेब लोखंडे, गटशिक्षण अधिकारी मनोहर वाघमारे, विस्तार अधिकारी सुनील मारवाडी, दत्तात्रय पवार, पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड आदींनी सत्कार केला.

Web Title: Angadgaon's Kabaddi Sangh on district level