र. वी. शाह विद्यालयात क्रीडा स्पर्धांचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 23:29 IST2019-12-29T23:28:24+5:302019-12-29T23:29:12+5:30

र.वी. शाह माध्यमिक व वर्धमान उच्च माध्यमिक विद्यालयात सुरू असलेल्या हिवाळी क्रीडा स्पर्धांचा समारोप झाला. यानिमित्त बौद्धिक व आनंदी खेळ तसेच खरी कमाई आनंदमेळा घेण्यात आला.

And. V Sports Competition ends at Shah Vidyalaya | र. वी. शाह विद्यालयात क्रीडा स्पर्धांचा समारोप

मालेगाव येथील र. वी. शाह विद्यालयात क्रीडा स्पर्धांच्या समारोपप्रसंगी उपस्थित डॉ. विपीन पारेख, भाग्येश पटणी, अशोक पटणी, परेश शाह, प्रताप शाह, प्राचार्य संजय बेलन, एम.टी. शेवाळे, एस. बी. जाधव, एस.टी.हाडोळे आदी.

 मालेगाव : येथील र.वी. शाह माध्यमिक व वर्धमान उच्च माध्यमिक विद्यालयात सुरू असलेल्या हिवाळी क्रीडा स्पर्धांचा समारोप झाला. यानिमित्त बौद्धिक व आनंदी खेळ तसेच खरी कमाई आनंदमेळा घेण्यात आला.
उद्घाटन डॉ. विपीन पारेख व संचालक भाग्येश पटणी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अशोक पटणी, उपाध्यक्ष परेश शाह, सचिव प्रताप शाह, प्राचार्य संजय बेलन, पर्यवेक्षक व्ही.एन.कासार आदी उपस्थित होते. यावेळी पटणी व प्राचार्य बेलन यांनी विद्यार्थ्यांसह बौद्धिक खेळाचा आनंद लुटला. खरी कमाई आनंद मेळावा महोत्सवास प्रारंभ झाला. सचिव प्रताप शाह यांचे भाषण झाले. एस.आर.जोशी, एम.टी.शेवाळे, एस. बी. जाधव, एस.टी.हाडोळे, श्रीमती एस.ए. सूर्यवंशी, सौरभ बिरारी, टी.के. देसले यांच्यासह शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: And. V Sports Competition ends at Shah Vidyalaya