...अन् एलआयसी कार्यालयातून श्वानाची सुटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 15:55 IST2019-10-13T15:54:56+5:302019-10-13T15:55:17+5:30
पिपळगाव बसवंत : येथील व्यापारी भवनातील एलआयसीच्या कार्यालयात शुक्रवारी भटके श्वान अडकल्याची घटना घडली.

...अन् एलआयसी कार्यालयातून श्वानाची सुटका!
पिपळगाव बसवंत : येथील व्यापारी भवनातील एलआयसीच्या कार्यालयात शुक्रवारी भटके श्वान अडकल्याची घटना घडली. शुक्रवारी भटके श्वान सर्वांची नजर चुकवून कार्यालयात शिरले व अडगळीला जाऊन लपले. कार्यालयातील एकाही कर्मचाऱ्याच्या लक्षात आले नाही. नियमित काम करून कर्मचारी सायंकाळी आपल्या वेळेला कार्यालय बंद करून घरी गेले. शनिवारी (दि. १२) एक श्वान कार्यालयाच्या खिडकीत उभे राहून जोरजोराने भुंकत होता. ही बाब तेथून जाणारे आकाश देशमाने व सुमित कापरे यांच्या लक्षात आली. त्यांनी एलआयसी कार्यालयीन कर्मचारी अशोक गुजर यांच्याशी संपर्कसाधला. गुजर यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत सुरक्षारक्षकांना बोलावून कार्यालय उघडून श्वानाची सुटका केली. दुसरा शनिवार व रविवार असल्याने शुक्र वारी कार्यालयात शिरलेल्या या श्वानाची सोमवारपर्यंत सुटका झाली नसती. नागरिकांच्या सतर्कतेमुळे श्वानाची सुटका झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.