अन् गॅस टॅँकर रस्त्यावर

By Admin | Updated: January 12, 2016 22:18 IST2016-01-12T22:13:36+5:302016-01-12T22:18:00+5:30

अन् गॅस टॅँकर रस्त्यावर

And gas tanker on the road | अन् गॅस टॅँकर रस्त्यावर

अन् गॅस टॅँकर रस्त्यावर

. तळेगावरोही : चांदवड तालुक्यातील वाहेगावसाळनजीक पलटी झालेला गॅस टॅँकर (एमएच ४६ एच ४२५८) तब्बल चौदा तासांच्या अथक प्रयत्नानंतर रस्त्यावर आणण्यात यश आल्याने परिसरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.
अपघातग्रस्त गॅस टॅँकर पाच दिवसांपूर्वी पलटी झाला होता. त्यासाठी पाच क्रेन व जेसीबीच्या साहाय्याने रात्री १२ वाजेपर्यंत टॅँकर रस्त्यावर काढण्यात आला. सकाळी १० वाजेपासून लासलगाव-मनमाड रस्त्यावरील लासलगाव फाटा ते वाहेगावसाळदरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली होती. रस्ता बंद केल्यामुळे लासलगावी जाणाऱ्या महाविद्यालयीन व विद्यालयीन विद्यार्थ्यांचे हाल झाले. शेतकऱ्यांना शेतमाल, कांदा विक्रीसाठी बाजारपेठेत जाण्यास विलंब झाला. तसेच टॅँकर पलटी झालेल्या ठिकाणच्या वस्तीवरील शेतकऱ्यांना टॅँकर पलटी झाल्याने आपल्या घरातील चुली, गॅस, विद्युतपुरवठा काही काळापुरता बंद ठेवावा लागला. चांदवडचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर.एस. मार्तंड, बागुल घटनास्थळी तळ ठोकून होते, तर काही अनर्थ घडू नये याकरिता मनमाड येथील अग्निशमन दलाचे कर्मचारी व गाडी तैनात करण्यात आली होती.






गॅस टॅँकर पूर्ण भरलेल्या स्थितीत रस्त्यावर आणल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Web Title: And gas tanker on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.