...अन् गीतांजली एक्सप्रेसचा अपघात टळला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 14:19 IST2018-01-09T14:19:02+5:302018-01-09T14:19:13+5:30
मनमाड (नाशिक)- मनमाड रेल्वे स्थानकावरून मुंबई हावडा गीतांजली एक्सप्रेस जात असताना रेल्वे रूळाला तडा गेल्याची घटनेमुळे या गाडीचा संभाव्य अपघात टळला आहे.

...अन् गीतांजली एक्सप्रेसचा अपघात टळला !
मनमाड (नाशिक)- मनमाड रेल्वे स्थानकावरून मुंबई हावडा गीतांजली एक्सप्रेस जात असताना रेल्वे रूळाला तडा गेल्याची घटनेमुळे या गाडीचा संभाव्य अपघात टळला आहे. मनमाड येथे थांबा नसलेली गीतांजली एक्सप्रेस फलाट क्र मांक दोन वरून भरधाव वेगात रवाना होत असताना स्टेशन मास्तर कार्यालयासमोर मोठा आवाज झाला. याबाबत फलाटावरील विक्र ेते अल्ताफ मणियार व विजय पगारे यांनी स्टेशन मास्तरांना माहिती दिली. या ठिकाणी तपासणी केली असता रेल्वे रु ळाला तडा गेला असल्याचे दिसून आले. रेल्वे कर्मचाºयांनी तात्काळ धाव घेत रु ळाची दुरु स्ती केली . सुदैवाने सदरचा प्रकार वेळीच निदर्शनास आल्याने मोठा अपघात टळला आहे. गीतांजली गेल्यानंतर आलेल्या आवाजाने काही काळ रेल्वे वाहतुक थांबविण्यात आली होती. रेल्वेचे यातायात पथकाने तात्काळ धाव घेऊन सदर रेल्वे रूळाचे काम तातडीने पूर्ण केले. त्यांनतर वाहतुक सुरळित सुरू झाली. उत्तर भारतात जाणाºया सर्व लांबपल्लयाच्या गाड्या याच मार्गावरून जातात.