शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

आनंदवलीत संदल

By admin | Updated: September 26, 2016 01:41 IST

लंगर : रांझेशाह दर्ग्यावर भाविकांची गर्दी

नाशिक : सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले आनंदवली येथील शहीद हजरत सय्यद हसन रांझेशाह बाबा यांच्या संदलनिमित्त भाविकांची गर्दी लोटली होती. शुक्रवारपासून (दि.२३) दर्गा परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.आनंदवली येथील रांझेशाह बाबा यांचा दर्गा राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोख्याचे प्रतीक मानला जातो. नवश्या गणपतीच्या मंदिराला लागूनच दर्गा असून, या ठिकाणी हिंदू-मुस्लीम समाजबांधव मोठ्या भक्तिभावाने आवर्जून हजेरी लावतात. दोन्ही देवस्थाने प्रसिद्ध असून, दरवर्षी रांझेशाह बाबा यांचा संदल उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. शुक्रवारी संध्याकाळपासून संदल उत्सवाला सुरुवात झाली. कव्वाल नईम चिश्ती, सादिक अशरफी यांनी ‘महफिल-ए-समा’मध्ये एकापेक्षा एक सरस उर्दू शेरोशायरीची उधळण करीत सुफीसंतांवर आधारित कव्वाली सादर केल्या. शनिवारी सकाळी रांझेशाह बाबा दर्गा विश्वस्त समितीच्या वतीने जुने नाशिकमधील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्ग्यावर चादर अर्पण करण्यात आली. सायंकाळी आनंदवल्ली येथे मिलादची मैफल पार पडली. तत्पूर्वी मुस्लीम बांधवांनी कुराणपठण केले.