अपार्टमेंटच्या वाहनतळात इलेक्ट्रिक बाइकचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 01:48 AM2022-05-18T01:48:50+5:302022-05-18T01:53:01+5:30

पाथर्डी फाटा येथील आनंदनगर भागात एका अपार्टमेंटच्या वाहनतळात मंगळवारी (दि. १७) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अचानकपणे एका इलेक्ट्रिक दुचाकीचा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत वाहनतळातील अन्य पाच दुचाकीही पूर्णत: जळाल्या.

An electric bike exploded in the parking lot of the apartment | अपार्टमेंटच्या वाहनतळात इलेक्ट्रिक बाइकचा स्फोट

अपार्टमेंटच्या वाहनतळात इलेक्ट्रिक बाइकचा स्फोट

Next
ठळक मुद्देधक्कादायक: आरेाग्य यंत्रणा सतर्क; ग्रामीण भागात सर्वाधिक प्रादुर्भाव

इंदिरानगर : पाथर्डी फाटा येथील आनंदनगर भागात एका अपार्टमेंटच्या वाहनतळात मंगळवारी (दि. १७) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अचानकपणे एका इलेक्ट्रिक दुचाकीचा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत वाहनतळातील अन्य पाच दुचाकीही पूर्णत: जळाल्या. घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच जवान घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. आनंद नगर परिसरात ‘मल्हार रेसिडेन्सी’ नावाचे अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री दीड ते पावणेदोन वाजेच्या सुमारास अचानकपणे वाहनतळात एकापाठोपाठ स्फोटसदृश्य आवाज झाला. या आवाजाने रहिवासी खडबडून जागे झाले. दरम्यान, वाहनतळात जास्त प्रकाश आणि धुराचे लोट उठत असल्याचे दिसले. तसेच अपार्टमेंटच्या बाहेरून रस्त्यावर उभे असलेले काही लोक ‘आग लागली, आग लागली’ असे ओरडत होते. यामुळे काही रहिवाशांनी खाली धाव घेतली. यावेळी दुचाकी वाहने आगीमध्ये जळत होती. रहिवाशांनी पाणी फेकले, मात्र आगीचे स्वरूप मोठे असल्याने आग विझत नव्हती. जागरूक नागरिकांनी त्वरित अग्निशमन दल व इंदिरानगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. सिडको उपकेंद्रावरील जवानांनी बंबासह घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणल; मात्र तोपर्यंत वाहनतळातील पाचही दुचाकींचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता. आग वेळीच आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: An electric bike exploded in the parking lot of the apartment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.