पेठच्या ग्रामीण रुग्णालयातील असुविधांवर लोकवर्गणीची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:15 IST2021-04-20T04:15:17+5:302021-04-20T04:15:17+5:30

शासनाच्या आरोग्य विभागामार्फत पेठ येथे ग्रामीण रुग्णालयासाठी सुसज्ज इमारत सोबत आवश्यक साहित्यही पुरवण्यात आले; मात्र या-ना-त्या कारणाने कोट्यवधीचे साहित्य ...

The amount of population on the inconveniences of the rural hospital of Peth | पेठच्या ग्रामीण रुग्णालयातील असुविधांवर लोकवर्गणीची मात्रा

पेठच्या ग्रामीण रुग्णालयातील असुविधांवर लोकवर्गणीची मात्रा

शासनाच्या आरोग्य विभागामार्फत पेठ येथे ग्रामीण रुग्णालयासाठी सुसज्ज इमारत सोबत आवश्यक साहित्यही पुरवण्यात आले; मात्र या-ना-त्या कारणाने कोट्यवधीचे साहित्य निकामी झाल्याने सद्यस्थितीत ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होताना दिसून येत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून तर सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत मनुष्यबळाचा अभाव असल्याने सामान्य रुग्णांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

यासंदर्भात विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार संदीप भोसले आदींनी रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली असता, रुग्णांनी तक्रारीचा पाढा वाचला. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने ग्रामीण रुग्णालयातील सर्व बेड कोविडसाठी तयार करण्याचे आदेश झिरवाळ यांनी दिले; मात्र ऑक्सिजनसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तहसील कार्यालयात बैठक घेऊन लोकवर्गणी उभी करण्याचे आवाहन केले. यामध्ये लोकप्रतिनिधी, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीतून ऑक्सिजन पाइपलाइन, जम्बो सिलिंडर, रुग्णवाहिका व आरोग्यविषयक साहित्य खरेदी करण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले.

इन्फो

वर्गणीचा ओघ सुरू

कोविडसारख्या महामारीच्या कचाट्यातून तालुक्यातील जनतेला वाचवण्यासाठी वर्गणीचा ओघही सुरू झाला असून, विभागनिहाय निधी संकलन केला जात आहे. या अभियानातून तरी सामान्य रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

फोटो - १९ पेठ ग्रामीण

पेठ येथे विभागप्रमुखांशी संवाद साधताना विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ.

===Photopath===

190421\19nsk_26_19042021_13.jpg

===Caption===

 फोटो - १९ पेठ ग्रामीण  पेठ येथे विभागप्रमुखांशी संवाद साधतांना विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ. 

Web Title: The amount of population on the inconveniences of the rural hospital of Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.