सभापतिपदी राष्टÑवादीचे अमोल भालेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 23:17 IST2019-03-02T23:16:37+5:302019-03-02T23:17:31+5:30
चांदवड : येथील पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्टÑवादी काँग्रेसचे अमोल उत्तमराव भालेराव, तर उपसभापतिपदी शिवसेनेच्या ज्योती विलास भवर यांची बिनविरोध निवड झाली.

चांदवड पंचायत समितीच्या सभापतिपदी अमोल भालेराव, उपसभापतिपदी ज्योती भवर यांच्या निवडीप्रसंगी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, उत्तमबाबा भालेराव, डॉ. सयाजीराव गायकवाड, नितीन अहेर, रघुनाथ अहेर, विजय जाधव, बाळासाहेब माळी, यू. के. अहेर, शैलेश ठाकरे, प्रा. अभिमन्यू ठाकरे, प्रकाश शेळके, रिजवान घासी, राष्टÑवादी कॉँग्रेस व शिवसेनचे कार्यकर्ते व नेते.
चांदवड : येथील पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्टÑवादी काँग्रेसचे अमोल उत्तमराव भालेराव, तर उपसभापतिपदी शिवसेनेच्या ज्योती विलास भवर यांची बिनविरोध निवड झाली.
पंचायत समितीचे सभापती नितीन गांगुर्डे व अमोल भालेराव यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने प्रभारी सभापतिपदी सभापती मनीषा पवार यांची काही काळ निवड केली होती. प्रारंभी सभापतिपदासाठी अमोल भालेराव, डॉ. नितीन गांगुर्डे, ज्योती अहेर तर उपसभापतिपदासाठी ज्योती भवर, डॉ. नितीन गांगुर्डे, ज्योती अहेर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. माघारीच्या वेळी इतरांनी माघार घेतल्याने दोघांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी सभागृहात पंचायत समिती सदस्य अमोल भालेराव (राष्टÑवादी), ज्योती भवर (शिवसेना), नितीन अहेर (शिवसेना), शिवाजी सोनवणे (कॉँग्रेस), डॉ. नितीन गांगुर्डे (भाजपा), निर्मला अहेर (कॉँग्रेस), पुष्पा धाकराव (भाजपा) आदी आठ सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर प्रशासनाच्या वतीने नूतन सभापती व उपसभापती यांचा सत्कार करण्यात आला.
भाजपाने शब्द फिरविल्याने राष्टÑवादी शिवसेनेबरोबरचांदवड पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत दोन वर्षांपूर्वी भाजपा व राष्टÑवादी कॉँग्रेस यांची युती होऊन सभापतिपदी भाजपाचे डॉ. नितीन गांगुर्डे, उपसभापतिपदी राष्टÑवादीचे अमोल भालेराव यांची निवड झाली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांच्या समवेत सव्वा-सव्वा वर्ष सभापती व उपसभापती यांना आलटून पालटून दिले जातील असे ठरले असताना तब्बल दोन वर्षे सभापतींनी राजीनामा दिला नाही. नंतर मात्र एकत्रच दोघांनी राजीनामा दिल्याने भाजपाने शब्द न पाळल्याने शेवटी शिवसेनेबरोबर युती करावी लागली, अशी प्रतिक्रिया अमोल भालेराव यांनी व्यक्त केली. तर भाजपाने त्या निवडणुकीत शिवसेनेला बाजुला ठेवल्याने त्याचा बदला घेतल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नितीन अहेर यांनी सांगीतले.