जुनी शेमळीच्या सरपंचपदी अमोल बच्छाव बिनविरोध
By Admin | Updated: November 16, 2016 23:47 IST2016-11-16T23:48:34+5:302016-11-16T23:47:24+5:30
जुनी शेमळीच्या सरपंचपदी अमोल बच्छाव बिनविरोध

जुनी शेमळीच्या सरपंचपदी अमोल बच्छाव बिनविरोध
सटाणा : तालुक्यातील जुनी शेमळीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल भरत बच्छाव यांची बिनविरोध निवड झाली.
रिक्त झालेल्या सरपंचपदाच्या निवडीसाठी बुधवारी (दि. १६) पंचायतीच्या सभागृहात सदस्यांची विशेष सभा बोलावण्यात आली होती. सरपंचपदासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल बच्छाव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. या पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बी. डी. धिवरे यांनी घोषित केले. निवडीनंतर मावळते सरपंच राहुल शेलार, उपसरपंच मोहिनी निकम यांनी नवनिर्वाचित सरपंच अमोल बच्छाव यांचा सत्कार केला.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य कासूबाई बच्छाव, ज्योती बच्छाव, रमेश निकम, नरेंद्र खैरनार, गंगाबाई शेलार, शीला पवार, माजी सरपंच भरत बच्छाव, मुख्याध्यापक सुरेश शेलार, माजी सरपंच रामकृष्ण बच्छाव, संजय पवार, माजी उपसरपंच संदीप बच्छाव, दिलीप निकम, ग्रामसेवक काथेपुरी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)