नाशिकचे अंंबरकर, मालेगावचे बोरसे यांना राष्ट्रपतिपदक
By Admin | Updated: August 15, 2014 00:52 IST2014-08-15T00:47:07+5:302014-08-15T00:52:34+5:30
नाशिकचे अंंबरकर, मालेगावचे बोरसे यांना राष्ट्रपतिपदक

नाशिकचे अंंबरकर, मालेगावचे बोरसे यांना राष्ट्रपतिपदक
मुंबई : शौर्य व गुणवत्तापूर्ण सेवा बजावल्याबद्दल राज्य पोलीस दलातील ६५ अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गृह मंत्रालयाकडून याची घोषणा करण्यात आली. नाशिकच्या विनोद अंबरकर यांचा, तर मालेगाव येथील गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी किशोर चिमणराव बोरसे यांना राष्ट्रपतिपदक जाहीर करण्यात आले आहे. पोलीस मुख्यालयातील अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) प्रभात रंजन, दक्षिण विभागाचे अप्पर आयुक्त कृष्णप्रकाश आदी ४० जणांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक जाहीर झाले आहे.